बाळासाहेब थोरात उद्या भरणार उमेदवारी अर्ज, शक्तीप्रदर्शनही करणार

बाळासाहेब थोरात उद्या भरणार उमेदवारी अर्ज, शक्तीप्रदर्शनही करणार

राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे.

  • Share this:

सागर कुलकर्णी, मुंबई, 29 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकांचे वारे राज्यभरात वेगाने वाहू लागले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात उद्या संगमनेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मतदारसंघात ते मोठं शक्तीप्रदर्शन करणार असल्याची माहिती आहे.

राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. उमेदवार निश्चित करण्यासाठी काँग्रेसच्या दिल्लीत अनेक बैठका झाल्या. त्यानंतर आज काँग्रेसची पहिली उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. उद्यापासून उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील, अशी माहिती आहे.

संगमनेरमध्ये थोरातांची कोंडी करण्याचा भाजपचा प्रयत्न

लोकसभा निवडणुकीपासून भाजपने थेट काँग्रेसच्या नेतृत्वाचीच कोंडी करण्याची रणनीती आखली. लोकसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची त्यांच्या नांदेड मतदारसंघात कोंडी केली. परिणामी चव्हाण यांचा या निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही भाजपचे यादृष्टीनेच प्रयत्न सुरू आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना त्यांच्या संगमनेर मतदारसंघात अडकवून ठेवण्याचा भाजपचा प्लॅन आहे. काही दिवसांपूर्वी भाजपकडून किर्तनकार इंदुरीकर महाराज यांचं नावंही संगमनेर मतदारसंघासाठी पुढे आले होते. मात्र स्वत: इंदुकरांनीच या चर्चा फेटाळल्या. त्यामुळे आता भाजपकडून थोरांताविरोधात या मतदारसंघातून कुणाला मैदानात उतरवण्यात येतं, हे पाहावं लागेल.

काँग्रेसची पहिली यादी लवकरच

काँग्रेसची पहिली यादी लवकरच जाहीर होणार आहे. या यादीत कुणाची नावं असतील, कोण कुठून उभं राहणार हे जवळपास ठरलं आहे. शुक्रवारी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यात उमेदवार ठरले होते. त्या वेळी ती यादी लीक झाल्याची चर्चा होती. आता शनिवारी कॉंग्रेस राष्ट्रवादीची बैठकही झाली. त्यामुळे अंतिम यादीवर शिक्कामोर्तब झाल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 50 उमेदवारांची पहिली यादी काँग्रेसने तयार केली आहे. यामध्ये 7 विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं आहे.

VIDEO: राजकारणापासून ते देशभरातील घडामोडींपर्यंत बातम्यांचा झटपट आढावा

Published by: Akshay Shitole
First published: September 29, 2019, 11:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading