'आजाराकडे दुर्लक्ष करणं परवडणारं नसतं', धीरज देशमुख हॉस्पिटलमध्ये दाखल

'आजाराकडे दुर्लक्ष करणं परवडणारं नसतं', धीरज देशमुख हॉस्पिटलमध्ये दाखल

लातूर ग्रामीण मतदारसंघाचे उमेदवार धीरज देशमुख यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

  • Share this:

लातूर, 15 ऑक्टोबर : लातूर ग्रामीण मतदारसंघाचे उमेदवार धीरज देशमुख यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून लातूरमधील सारडा हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यामुळे धीरज यांचा प्रचार बंद आहे. दुसरीकडे लातूर शहरमधून त्यांचे ज्येष्ठ बंधू अमित देशमुख निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही भावांच्या प्रचारासाठी अभिनेता रितेश देशमुख देखील मैदानात उतरला आहे. दरम्यान,धीरज आजारी असल्यानं त्यांच्या प्रचाराची धुरा रितेशच्या खांद्यावर येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

(वाचा :  लातूरमध्ये 'स्टार वॉर'; रितेश देशमुख Vs बाबा रामदेव असा रंगणार सामना)

धीरज देशमुख यांची फेसबुक पोस्ट

कोणत्याही लहान मोठ्या आजाराकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नसते. मागील दोन-तीन दिवसांपासून अंगात थोडासा ताप होता, पण प्रचार सभांच्या व्यस्ततेमुळे तब्येतीकडे जरा दुर्लक्षच झाले. शेवटी नाईलाजाने काल लातूरमध्येच दवाखाण्यात अॅडमीट व्हावे लागले आहे. हवामानातील सततच्या बदलामुळे सध्या तापीच्या आजाराचे प्रमाण सगळीकडे वाढले आहे.सध्या मी उपचार घेत असून आता प्रकृती सुधारते आहे. काळजी करावी असे कांहीं नाही.

माझे जिवाभावाचे कार्यकर्ते, हितचिंतक व आपण सर्वजण माझ्यासाठी प्रचार करत आहात.या दरम्यान आपण देखील तब्येतीची काळजी घ्या. तुमच्या शुभेच्छा आणि स्नेहाच्या बळावर मी लवकरच बरा होवून आपणासोबत प्रचारात सहभागी होईन हा विश्वास मला आहे.

माझ्या अनुपस्थितीत आपण प्रचाराचे कार्य जोमात सुरू ठेवल्याबद्दल मी आपले शतश: आभार व्यक्त करू इच्छितो.

"तुम्ही आहात, म्हणून मी आहे"

लवकरच भेटू !

- आपला धीरज

(वाचा :  NCPतील वाद चव्हाट्यावर,अजित पवारांच्या राजीनाम्यावर भुजबळांची स्फोटक प्रतिक्रिया)

(वाचा : मेलेल्या विरोधकांनी स्वतःच्या राजकीय आणि नपुंसकतेवर आधी बोलावं - उद्धव ठाकरे)

मुख्यमंत्री फडणवीसांकडून नारायण राणेंचं तोंडभरून कौतुक, पाहा VIDEO

Published by: Manoj Khandekar
First published: October 15, 2019, 3:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading