काँग्रेसची आणखी एक उमेदवार यादी जाहीर, कोकणातील उमेदवार बदलला

काँग्रेसची आणखी एक उमेदवार यादी जाहीर, कोकणातील उमेदवार बदलला

काँग्रेसने कुडाळ विधानसभा मतादारसंघातील उमेदवार बदलला आहे.

  • Share this:

मुंबई, 4 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली आणखी एक उमेदवार यादी जाहीर करत 5 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यावेळी काँग्रेसने कुडाळ विधानसभा मतादारसंघातील उमेदवार बदलला आहे. काँग्रेसकडून राघोबा कुडाळकर यांच्या जागी चेतन मोंडकर यांना संधी देण्यात आली आहे.

मतदानाची तारीख जवळ येत असल्याने निवडणुकीतील रंगत वाढत चालली आहे. विधानसभेसाठी उमेदवार अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी आपली अखेरची उमेदवार यादी जाहीर केली आहे. सकाळी भाजपने 7 उमेदवारांच्या नावाची घोषणा केल्यानंतर आता काँग्रेसने 5 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.

पाचव्या यादीत काँग्रेसने कुणाला दिली संधी?

नांदेड दक्षिण - मोहनराव माणिकराव हंबार्डे

मुखेड - भाऊसाहेब पाटील

पालघर (ST)- योगेश नाम

कुडाळ - चेतन मोंडकर

भिवंडी पूर्व - संतोष शेट्टी

दरम्यान, भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी आज चौथी यादी जाहीर केली आहे. यावेळी भाजपने धक्कातंत्राचा अवलंब केल्याचं पाहायला मिळत आहे. कारण भाजपने विद्यमान आमदारांसह काही मंत्र्यांचंही तिकीट कापलं आहे.

भाजपची चौथी यादी

मुक्ताईनगर - रोहिणी खडसे

काटोल - चरणसिंह ठाकूर

तुमसर - प्रदीप पडोले

नाशिक (पूर्व)- राहुल ढिकले

बोरिवली - सुनील राणे

घाटकोपर (पूर्वी) - पराग शाह

कुलाबा - राहुल नार्वेकर

VIDEO: प्रशासनाच्या भोंगळ कारभार; कंबरेएवढ्या पाण्यातून अंत्ययात्रा काढण्याची वेळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 4, 2019 12:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading