फॉर्म्युला फसणार? 'या' गोष्टीवरून सेना- भाजप युतीत निर्माण होऊ शकतो गंभीर पेच

फॉर्म्युला फसणार?  'या' गोष्टीवरून सेना- भाजप युतीत निर्माण होऊ शकतो गंभीर पेच

Maharashtra Assembly election 2019 लोकसभेनंतर आमचा युतीचा फॉर्म्युला ठरला आहे, असं सांगणारे भाजप-सेना नेते अद्यापही जागावाटपाबाबत एकमतावर पोहोचलेले नाहीत, अशी सूत्रांची माहिती आहे.

  • Share this:

मुंबई, 23 ऑगस्ट : लोकसभेनंतर आमचा युतीचा फॉर्म्युला ठरला आहे, असं सांगणारे भाजप-सेना नेते अद्यापही जागावाटपाबाबत एकमतावर पोहोचलेले नाहीत, अशी सूत्रांची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी युती केली. सेना-भाजप युती ही राज्यातली सर्वात जुनी युती असली तरी त्यामधले तणाव जगजाहीर आहेत. एवढंच काय महाराष्ट्र भाजप आणि केंद्रीय पातळीवरचा पक्ष यांच्यामध्येही किती जागा शिवसेनेला द्यायच्या याबाबत एकमत नाही. शिवसेनेला 288 पैकी फक्त एक तृतीयांश जागाच द्याव्यात अशी महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांची भूमिका आहे. अगदीच आग्रह झाला आणि केंद्राकडून हस्तक्षेप झाला, तर जास्तीत जास्त 100 जागा शिवसेनेसाठी सोडण्यास भाजप तयार आहे.

दुसरीकडे शिवसेना निम्म्या जागा मिळाल्या तरच युती या भूमिकेवर ठाम आहे. भाजप - सेनेत मोठा भाऊ कोण याविषयी खूप वेळा चर्चा झाली. पण आमचा फॉर्म्युला ठरला, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्रितपणे सांगितलं. पण जागावाटपाबद्दल दोन्ही पक्ष आपापला हट्ट सोडायला तयार नाहीत, अशी सूत्रांची माहिती आहे.

हेही वाचा : भाजपने शिवसेना व आरपीआयला डावललं, भुसावळात कार्यकर्ते नाराज

मागच्या वेळी भाजपने निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण याची घोषणा केली नव्हती. याही वेळी मुख्यमंत्रिपदी कोण याविषयी आधी चर्चा नको अशी शिवसेनेची भूमिका आहे. आदित्य ठाकरे यांचंही नाव मध्यंतरी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे येत होतं. उलट राज्यातले मुख्यमंत्र्यांच्या जवळचे नेते मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरच निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. मीच मुख्यमंत्री होणार, असं स्वतः फडणवीस यांनीदेखील जाहीरपणे म्हटलं आहे. त्यामुळे सेना- भाजप युतीचा पेच सुटण्याची चिन्हं नाहीत.

हे वाचा - पीकविम्याचे पैसे लाटणाऱ्यांवर कारवाई करा, उद्धव ठाकरेंची मोदी सरकारकडे मागणी

त्यातच शुक्रवारी (23 ऑगस्ट)उद्धव ठाकरे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन प्रधानमंत्री फसल योजनेवर जोरदार टीका केली. पीक विम्याचे पैसे लाटणाऱ्यांवर कारवाई करा, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांचा प्रश्न लावून धरला आहे. सरकारमध्ये असूनही सरकारला कारवाईची मागणी करणं, सरकारी योजनेवर टीका करणं हे शिवसेनेचं धोरण पाहता ही निवडणूकपूर्व तयारी असल्याचं बोललं जात आहे.

ही प्रधानमंत्री फसल योजना  विमा कंपनी बचाव योजना होऊ नये अशा शब्दांत त्यांनी टीका केली. शेतकऱ्यांचे 2 हजार कोटी रुपये विमा कंपन्यांकडे असल्याचे आणि आपण त्याचा पाठपुरावा करणार असल्याचंही उद्धव यांनी स्पष्ट केलं.

---------------------

VIDEO : राज ठाकरेंचा पुन्हा आक्रमक बाणा, कार्यकर्त्यांशी बोलताना सरकारला आव्हान

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: August 23, 2019, 3:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading