राणे पितापुत्रांसाठी 15 ऑक्टोबरला मुख्यमंत्री कणकवलीत, करणार मोठी घोषणा

राणे पितापुत्रांसाठी 15 ऑक्टोबरला मुख्यमंत्री कणकवलीत, करणार मोठी घोषणा

नारायण राणेंचे पूत्र नितेश राणेंसाठी मुख्यमंत्री कणकवलीत येतील का, अशी चर्चा सिंधुदुर्गात सुरू...

  • Share this:

सिंधुदुर्ग,11 ऑक्टोबर:कणकवलीत युती नसतानाही नितेश राणेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 15 ऑक्टोबरला कणकवलीत सभा घेणार असल्याचे नारायण राणे आणि भाजपच्या नेत्यांकडून जाहीर करण्यात आले आहे. मात्र, जिथे सेना-भाजप उमेदवार आमने-सामने आहेत.त्या मतदार संघात फडणवीस आणि उद्धव ठाकरे जाणार नाहीत, असा करार असल्याचे सांगत सुभाष देसाई यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे.

नारायण राणेंचे पूत्र नितेश राणेंसाठी मुख्यमंत्री कणकवलीत येतील का, अशी चर्चा आता सिंधुदुर्गात सुरु झाली आहे. येत्या 15 ऑक्टोबरला माननीय मुख्यनंत्र्यांची दुपारी दोन वाजता कणकवलीत सभा आहे. त्यानंतर ते मला जिथे पाठवतील तिथे मी जाईन, असे नारायण राणे यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यभर प्रचारसभा घेत आहेत. अशाच प्रकारे 15 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांची कणकवलीत सभा होणार आहे. जाहीर सभेत मुख्यमंत्री मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या या जाहीर सभे दरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे ही माहिती खुद्द नारायण राणे यांनीच प्रसारमाध्यमांना दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नारायण राणे हे भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र, शिवसेनेकडून कडाडून विरोध होत असल्यामुले राणेंच्या भाजप प्रवेशाला मुहूर्त मिळत नव्हता. पण आता हा मुहूर्त ठरला असून त्याची तारीखच नारायण राणेंनी सांगितली आहे. एवढेच नाही तर 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' भाजपत विलीन करण्यात येणार असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरु झाले. विधानसभा निवडणुकीपूर्वी नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आणि त्यांना भाजपने कणकवली मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

शिवसेना-भाजपमध्ये 'सामना'

कणकवली मतदारसंघातून भाजपने नितेश राणे यांना उमेदवारी दिली आहे. याच मतदारसंघातून शिवसेनेने सतीश सावंत यांना रिंगणात उतरवले आहे. यामुळे शिवसेनाविरुद्ध भाजपमध्ये 'सामना' रंगणार आहे.

माईंड इट...,मोदींचा खास दाक्षिणात्य लूक, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2019 05:57 PM IST

ताज्या बातम्या