'विधानसभेत वंचितचाच विरोधी पक्षनेता असेल', मुख्यमंत्र्यांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला टोला

'विधानसभेत वंचितचाच विरोधी पक्षनेता असेल', मुख्यमंत्र्यांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला टोला

महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला.

  • Share this:

नांदेड, 31 ऑगस्ट : आगामी विधानसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीचाच विरोधी पक्षनेता होईल, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला.

'वंचित ही भाजपाची बी टीम असल्याची टीका काँग्रेस-राष्ट्रवादीकडून केली जाते,' याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 'आता काँग्रेस राष्ट्रवादीच बी टीम झाली आणि वंचित ए टीम झाली. त्यामुळे पुढच्या विधानसभेत विरोधीपक्ष आणि विरोधी पक्षनेता वंचितचा असेल.'

आदित्य ठाकरेंबाबतही दिलं उत्तर

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्यास शिवसेनेनं सुरुवात केली आहे. शिवसेनेचे विधानपरिषद आमदार अनिल परब यांनी नुकतंच याबाबत भाष्यही केलं आहे. 'विधानसभा निवडणुकीत वरळीतला जो उमेदवार आहे, तोच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार आहे आणि तो मुख्यमंत्री म्हणजेच आदित्य ठाकरे आहेत,' असं कार्यकर्त्यांशी बोलताना अनिल परब म्हणाले. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उत्तर दिलं आहे.

'शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा दावेदार म्हणून प्रोजेक्ट करण्यात येत आहे. यावर तुमची प्रतिक्रिया काय?' असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी काहीसं तिरकस भाष्य करत करत 'अनिल परब हे शिवसेनेचे अधिकृत प्रवक्ते आहेत का?' असा प्रतिप्रश्न विचारला आहे. त्यामुळे आगामी काळात मुख्यमंत्रिपदावरून सेना-भाजपमध्ये चांगलीच रस्सीखेच रंगणार हे स्पष्ट आहे.

कोल्हापुरात भररस्त्यावर दोन महिलांचा फ्री स्टाईल हाणामारी, VIDEO व्हायरल

Published by: Akshay Shitole
First published: August 31, 2019, 2:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading