पंकजा Vs मेटे संघर्ष सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांनी पुरवला विनायक मेटेंचा हट्ट

पंकजा Vs मेटे संघर्ष सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांनी पुरवला विनायक मेटेंचा हट्ट

भाजप आणि शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांमध्ये शह-काटशहाचं राजकारण रंगत आहे.

  • Share this:

बीड, 27 ऑगस्ट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा बीडमध्ये पोहोचली. यावेळी मुख्यमंत्र्यांसमोरच राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्यात चांगलंच राजकीय नाट्य रंगलं. यावेळी विनायक मेटे यांनी आपला हट्ट पुरवत महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांचा सत्कारही केल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर भाजप आणि शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांमध्ये शह-काटशहाचं राजकारण रंगत आहे.

'महाजनादेश यात्रेत महायुतीचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर बीड जिल्ह्यात येणार असतील, तर महायुतीतील घटक पक्ष म्हणून मोठय़ा भावाचा लहान भावाने स्वागत आणि सत्कार कारणे ही माझी जबाबदारी आणि कर्तव्य आहे. या बाबतीत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती. हा ऐनवेळीचा कार्यक्रम नव्हता. गेल्या आठ दिवसांपासून आम्ही तयारी केली होती. यात राजकीय असं काही नाही,' असं म्हणत विनायक मेटे यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर असलेलं आपलं सख्य अधोरेखित केलं आहे.

दरम्यान, महाजनादेश यात्रेतील सत्कार नाट्यानंतर बीड मधील राजकारण ढवळून निघाले. भाजप आणि शिवसंग्राम आमने-सामने आले आहेत. यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहें. तर शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला. 'मुख्यमंत्री हे माझे चांगले मित्र आहे. मी केलेला आग्रह ते नक्की पाळतील,' असा विश्वास विनायक मेटेंनी त्यांच्या समर्थकांना दिला होता. यासाठी मेटेंनी शक्ती प्रदर्शनासाठी भव्य व्यासपीठावर उभारले होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेशच्या गाडीमध्येच रस्त्यावर सत्कार घेवून या सत्काराने भारावून गेलो, अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी मेटे समर्थकांनी 'बीड का आमदार कैसा हो, विनायक मेटे जैसा हो' अशा घोषणा दिल्या. तसंच विधानसभा निवडणुकीत बीडचं तिकीट मेटेंनाच द्या अशी मागणी केली,

या सगळ्या राजकीय नाट्यामध्ये मुख्यमंत्री महोदय हे आमचाही शब्द पाळतात, हे दाखवून देण्यामध्ये आमदार विनायक मेटे यशस्वी झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात मेटे आणि मुंडे यांच्यातील राजकीय संघर्षाचे बीडच्या राजकारणात काय परिणाम होतात, हे पाहावं लागेल.

VIDEO : धावत्या रिक्षातून विद्यार्थी फेकला गेला बाहेर, तोच उठून पळाला मागे

First published: August 27, 2019, 9:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading