चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का, उमेदवाराचा अर्ज बाद

चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का, उमेदवाराचा अर्ज बाद

उमेदवार ठरवताना राष्ट्रवादीला तारेवरची कसरत करावी लागली.

  • Share this:

चिंचवड, 5 ऑक्टोबर : चिंचवड विधानसभा मतदान संघात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. कारण चिंचवड विधानसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार प्रशांत शितोळे यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे. पक्षाचा अधिकृत AB फार्म नसल्याने आघाडीचे उमेदवार प्रशांत शितोळे यांचा उमेदवारी अर्ज छाननीत झाला बाद आहे.

एकीकाळी बालेकिल्ला असणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये उमेदवार ठरवताना राष्ट्रवादीला तारेवरची कसरत करावी लागली. अनेक दिवसांच्या घोळानंतर चिंचवड मतदारसंघातून राष्ट्रवादीने शेवटच्या क्षणी प्रशांत शितोळे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र त्यांच्या अर्जासोबत पक्षाचा AB फॉर्म नसल्याने हा अर्ज बाद करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकांच्या घोषणेनंतरही युतीत जागावाटपावरून संघर्ष झाला. तर आघाडीतही काही जागांवर बिघाडी झाल्याचं दिसत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीतील जागा वाटपाचा तिढा सुटला असं वाटत असतानाच पिंपरी शहरातील काँग्रेस नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. 'पिंपरी शहरातील तीन पैकी एक मतदारसंघ आम्हाला द्या, अन्यथा राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचारच करणार नाही,' अशी भूमिका काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली. त्यामुळे इथं आघाडीत बिघाडी झाल्याचं बोललं जात आहे. आचारसंहिता जाहीर ह्योण्याआधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पिंपरीतील जागांवरून काँग्रेस कार्यकर्त्यांना आश्वासन दिलं होतं. मात्र आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर मेळाव्यात पक्षाचे नेते अजित पवार यांनी शहरातील तीनही मतदार संघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्याचं सांगितलं. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज झाले.

सध्या भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरावर याआधी राष्ट्रवादीचं अधिराज्य होतं. मात्र त्याआधीही हे शहर राज्याच्या राजकारणाचं सत्ताकेंद्र म्हणून ओळखल जायचं ते काँग्रेसचे माजी शिक्षणमंत्री आणि या शहरातील दिवंगत नेते प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांमुळे. त्यामुळे या शहरात काँग्रेसला पुन्हा सुगीचे दिवस परत आणण्यासाठी काँग्रेसकडून एका मतदार संघावर दावा सांगितला जात होता. मात्र तसं झालं नाही आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी शेवटी टोकाची भूमिका घेत राष्ट्रवादीच्या उमेदवारांचं काम न करण्याचा इशारा दिला आहे.

VIDEO: मोजत बसा! उमेदवारी अर्ज भरण्यासाठी घेऊन आला 10 रुपयांचे चिल्लर

Published by: Akshay Shitole
First published: October 5, 2019, 3:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading