छगन भुजबळांच्या मतदारसंघात शिवसेनेची वाढली ताकद.. असे केले शक्तीप्रदर्शन

छगन भुजबळांच्या मतदारसंघात शिवसेनेची वाढली ताकद.. असे केले शक्तीप्रदर्शन

येवला मतदार संघात शिवसेनेची वाढलेली ताकद आणि स्वपक्षातून मिळणारे आव्हान त्यामुळे यंदाची निवडणूक छगन भुजबळ यांना पाहिजे तेवढी सोपी नाही

  • Share this:

बब्बू शेख,(प्रतिनिधी)

मनमाड, 29 सप्टेंबर: येवला मतदार संघात शिवसेनेची वाढलेली ताकद आणि स्वपक्षातून मिळणारे आव्हान त्यामुळे यंदाची निवडणूक छगन भुजबळ यांना पाहिजे तेवढी सोपी नाही, अशी चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळांनी रविवारी येवल्याच्या ग्रामीण भागात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. निमित्त होते दरसवाडी,पुणेगाव या धरणातून कालव्याद्वारे येवल्याकडे आलेल्या पाण्याच्या जलपूजन कार्यक्रमाचे..

छगन भुजबळ यांच्या सोबत यावेळी त्यांचा पुतण्या आणि माजी खासदार समीर भुजबळ, मुलगा आमदार पंकज भुजबळ आणि दोन्ही सुना देखील होत्या. गेल्या पन्नास वर्षांपासून दरसवाडी-पुणेगाव-डोंगरगाव पोहोच कालव्याच्या रखडलेले होते. कामाला छगन भुजबळ येवल्यातून आमदार झाल्यानंतर त्याला चालना मिळाली. भुजबळ यांनी मांजरपाड्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची निर्मिती केल्यानंतर यंदाच्या पावसात मांजरपाड्यातून पूरपाणी वाहू लागले आहे. त्यामुळे दरसवाडी, पुणेगाव ही धरणे भरुन त्याचे पाणी कालव्यातून येवल्याकडे येण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची वाट पाहणाऱ्या येवला तालुक्यातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी कालव्यातून आलेल्या पाण्याचे जलपूजनाचा कार्यक्रम छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रविवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे निमित्त साधून छगन भुजबळ यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. ग्रामीण भागातील मतदारांशी संवाद साधला.

शिवसेना प्रवेशबाबत काय म्हणाले छगन भुजबळ..

'मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे आणि याच पक्षाकडूनच येवल्या विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचे छगन भुजबळ यांनी आधीच स्पष्ट केले आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष शक्तीप्रदर्शन करत आहे, असे मत भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेबाबत व्यक्त केले होते. दरम्यान, भुजबळ येवल्यातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

पुणेगाव कालव्यातून पाटाद्वारे येवल्याकडे पाणी सोडण्यात आले. पाटाचे दरवाजे उघडण्यासाठी छगन भुजबळ मनमाडजवळ दरसवाडी येथे आले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आणि आज नाशिकला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेबाबत भाष्य केले. सध्या निवडणूक जवळ आल्याने सर्वच पक्ष शक्तीप्रदर्शन करत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

VIDEO:अजित पवार कुठून लढणार? जयंत पाटलांनी केलं जाहीर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 29, 2019 05:28 PM IST

ताज्या बातम्या