छगन भुजबळांनी जागा वाटपाबाबत भाजप आणि मित्रपक्ष काँग्रेसला दिला 'हा' सल्ला

छगन भुजबळांनी जागा वाटपाबाबत भाजप आणि मित्रपक्ष काँग्रेसला दिला 'हा' सल्ला

मुसळधार पावसामुळे पुण्यात हाहाकार उडाला आहे. त्यात विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी भाजप आणि मित्रपक्ष काँग्रेसला एक सल्ला दिला आहे.

  • Share this:

प्रशांत बाग (प्रतिनिधी),

नाशिक,26 सप्टेंबर: मुसळधार पावसामुळे पुण्यात हाहाकार उडाला आहे. त्यात विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी भाजप आणि मित्रपक्ष काँग्रेसला एक सल्ला दिला आहे. जागावाटप 2 दिवसांनंतर करा, आधी पुण्यात पूरस्थितीकडे लक्ष द्या, असा सल्ला छगन भुजबळ यांनी दिला आहे. दिल्लीत आज भाजप कोअर कमिटी बैठक आहे. याचबरोबर काँग्रेसचीही दिल्लीत छाननी समिती बैठक सुरू आहे. अर्थात सत्ताधाऱ्यांची जबाबदारी महत्त्वाची असल्याचेही भुजबळ म्हणाले. शरद पवार यांना ईडी केलेले आरोप आणि माझ्यावर लावलेला 409 कलम हा सत्तेचा दुरुपयोग आहे, अशा शब्दांत भुजबळ यांनी यावेळी सरकार आरोप केला आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ...

मागेही सत्ताधारी भाजप-शिवसेनेमधील मंत्री महाजनादेश यात्रेत अडकले होते. त्यामुळे कोल्हापूर, सांगलीतील पूरस्थितीकडे सरकारचे सपशेल दूर्लक्ष झाले. पुण्यात सध्या पूरपरिस्थिती गंभीर आहे. कितीही मदत केली तरी सांगली, कोल्हापूर सारखे शहरे पुन्हा उभी राहायला 10 वर्षे लागतील. मंत्री तिकीट वाटपावर चर्चा करण्यात गुंतले आहे. आधी पुण्याकडे लक्ष द्यायला हवे. जागावाटपाकडे दोन दिवसांनी लक्ष दिले तरी चालेल, असा टोला भुजबळ यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.

उद्या (शुक्रवारी) शरद पवार ईडी कार्यालयात जाणार असल्याने आम्ही सर्व नेते मुंबई ष्ट्रवादी कार्यालयात उपस्थित राहून त्यांना पाठिंबा देणार आसल्याचे भुजबळांनी सांगितले. ईडीने तेव्हाही कलम वाढवले होते. त्यावेळी अँटी करप्शनने 409 कलम लावला होता. मात्र, कोर्टाने ते मान्य केले नाही. तपासणीत काही समोर आले नसताना देखील कलम का टाकले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सत्ताधारी घाबरवण्याचा प्रयत्न करत असले तर आम्ही कायदेशीर मार्गाने त्याला विरोध करू, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला आहे.

पुणे: पाण्यात अडकलेल्या चिमुकल्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2019 02:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading