NCPतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, अजित पवारांच्या राजीनाम्यावर भुजबळांची स्फोटक प्रतिक्रिया

NCPतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, अजित पवारांच्या राजीनाम्यावर भुजबळांची स्फोटक प्रतिक्रिया

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेच्या विषयावरून आता राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांची आपापसात जुंपल्याचं पाहायला मिळत आहे.

  • Share this:

नाशिक, 15 ऑक्टोबर : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेच्या विषयावरून आता राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांची आपापसात जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. बाळासाहेबांच्या अटकेला विरोध होता पण विभागप्रमुखांच्या हट्टामुळे कारवाई झाली, असं सांगत थेट छगन भुजबळ यांच्यावरच खापर फोडलं होतं. यास आता भुजबळांनीही चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. पवारांच्या याच जखमेवर बोट ठेवत भुजबळ म्हणालेत की,'शरद पवार ज्या दिवशी ईडी कार्यालयात जाणार होते, त्याच दिवशी अजित पवारांनी राजीनामा द्यायला नको होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे फोकस बदलला',अशा शब्दांत भुजबळांनी अजित पवारांवर निशाणा साधला. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत भुजबळांनी हे विधान केलं आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील अंतर्गत वाद मात्र काही संपता संपत नाहीयेत.

(वाचा :  'ना'राजीनामा नाट्य! शिवसेनेच्या 350 पदाधिकारी, 36 नगरसेवकांचा केला जय महाराष्ट्र)

नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?

'ज्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ईडी कार्यालयात जाणार होते. त्याच दिवशी अजित पवारांनी राजीनामा देण्याची आवश्यकता नव्हती. बँकेचं सदस्य आणि संचालक नसताना त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यामुळे वातावरण तापलं. पण काही वेळानं वातावरण बदललं आणि फोकसही बदलला. अजित पवार भावनाप्रधान आहेत हे मान्य पण दोन दिवस भावना आवरल्या असतं तर बरं झालं असतं', असं म्हणत भुजबळांनी अजित पवारांवर निशाणा साधला.

(वाचा :मुंबई काँग्रेसच्या नेत्यांचा आडमुठेपणा कायम; राहुल गांधींच्या सभेत नाराजीनाट्य)

बाळासाहेबांच्या अटकेबाबत छगन भुजबळ म्हणाले...

बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्यात मला आनंद नव्हता. मी त्यांना जेलमध्ये पाठवणार नव्हतो. शक्य झालं नाही तर त्यांना मातोश्रीवरच ठेवणार होतो. पण त्यांना त्रास द्यायचा नव्हता, अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली.

(वाचा : भाजप पुन्हा सत्तेत आल्यास तुम्हाला काय मिळणार? जाणून घ्या 1 मिनिटात)

सत्तेसाठी राणेंची सर्वात मोठी तडजोड; सेनेशी जुळवून घेणं राणेना अपरिहार्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 15, 2019 02:15 PM IST

ताज्या बातम्या