राज्यातील तब्बल 798 उमेदवारांचं विधानसभा गाठण्याचं स्वप्न भंगलं, अर्ज बाद झाल्याने नामुष्की

राज्यातील तब्बल 798 उमेदवारांचं विधानसभा गाठण्याचं स्वप्न भंगलं, अर्ज बाद झाल्याने नामुष्की

विधानसभा गाठण्यासाठी उमेदवार 5 वर्ष आपल्या मतदारसंघात मोर्चेबांधणी करत असतात.

  • Share this:

मुंबई, 6 ऑक्टोबर : विधानसभा गाठण्यासाठी उमेदवार 5 वर्ष आपल्या मतदारसंघात मोर्चेबांधणी करत असतात. पण मोक्याच्या क्षणी झालेली एक चूक त्यांना निवडणूक लढवण्यापासून दूर ठेवते. अर्ज भरण्यात केलेल्या अशाच चुकीमुळे यंदा राज्यातील तब्बल 798 इच्छुक निवडणूक लढवू शकत नाहीत. असं असलं तरीही राज्यभरातील तब्बल 4739 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी यातील प्रत्येकजणच प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची राज्यभरात छाननी करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण दाखल 5543 उमेदवारांपैकी 4739 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्रुटी आढळल्याने 798 उमेदवारांचे अर्ज नामंजुर झाले आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी श्री. दिलीप शिंदे यांनी दिली आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज ठरले वैध?

नंदुरबार - 4 मतदारसंघात 36 उमेदवारांचे अर्ज वैध

धुळे - 5 मतदारसंघात 56 उमेदवार

Loading...

जळगाव - 11 मतदारसंघात 154 उमेदवार

बुलढाणा - 7 मतदारसंघात 75 उमेदवार

अकोला - 5 मतदारसंघात 101 उमेदवार

वाशिम - 3 मतदारसंघात 60 उमेदवार

अमरावती - 8 मतदारसंघात 151 उमेदवार

वर्धा - 4 मतदारसंघात 59 उमेदवार

नागपूर - 12 मतदारसंघात 181 उमेदवार

भंडारा - 3 मतदारसंघात 66 उमेदवार

गोंदीया - 4 मतदारसंघात 71 उमेदवार

गडचिरोली - ३ मतदारसंघात 44 उमेदवार

चंद्रपूर - 6 मतदारसंघात 90 उमेदवार

यवतमाळ - 7 मतदारसंघात 125 उमेदवार

नांदेड - 9 मतदारसंघात 327 उमेदवार

हिंगोली - 3 मतदारसंघात 54 उमेदवार

परभणी - 4 मतदारसंघात 81 उमेदवार

जालना - 5 मतदारसंघात 133 उमेदवार

औरंगाबाद - 9 मतदारसंघात 208 उमेदवार

नाशिक - 15 मतदारसंघात 212 उमेदवार

पालघर - 6 मतदारसंघात 69 उमेदवार

ठाणे - 18 मतदारसंघात 251 उमेदवार

मुंबई उपनगर - 25 मतदारसंघात 272 उमेदवार (वांद्रे पश्चिम मतदारसंघाची माहिती रात्री उशीरापर्यंत अप्राप्त)

मुंबई शहर - 10 मतदारसंघात 84 उमेदवार

रायगड - 7 मतदारसंघात 112 उमेदवार

पुणे - 21 मतदारसंघात 372 उमेदवार

अहमदनगर - 12 मतदारसंघात 182 उमेदवार

बीड - 6 मतदारसंघात 202 उमेदवार

लातूर - 6 मतदारसंघात 120 उमेदवार

उस्मानाबाद - 4 मतदारसंघात 82 उमेदवार

सोलापूर - 11 मतदारसंघात 237 उमेदवार

सातारा - 8 मतदारसंघात 108 उमेदवार

रत्नागिरी - 5 मतदारसंघात 40 उमेदवार

सिंधुदूर्ग - 3 मतदारसंघात 27 उमेदवार

कोल्हापूर - 10 मतदारसंघात 186 उमेदवार

सांगली - 8 मतदारसंघात 111 उमेदवार

VIDEO : राज्याचा मुख्यमंत्री हा मराठा असावा, मराठा क्रांती मोर्च्याची मागणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 6, 2019 09:16 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...