मुख्यमंत्री शिवसेनेचा की भाजपचा? रामदास आठवले म्हणाले...

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार? यावर आपली प्रतिक्रिया मांडली आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 10, 2019 07:11 AM IST

मुख्यमंत्री शिवसेनेचा की भाजपचा? रामदास आठवले म्हणाले...

मुंबई, 10 सप्टेंबर : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपकडून जाहिररित्या अनेकदा युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. पण होणारा मुख्यमंत्री भाजपचा की शिवसेनेचा? यावरून मात्र दोन्ही पक्षांमध्ये नेहमीच वरचढीची चर्चा होताना पाहायला मिळत आहे. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मीच येणार असल्याचा दावा केलेला असताना, दुसरीकडे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार असल्याचा वारंवार उल्लेख शिवसैनिकांकडून केला जात आहे.

या सर्व चर्चादरम्यानच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार? यावर आपली प्रतिक्रिया मांडली आहे.

नेमकं काय म्हणाले रामदास आठवले?

आगामी विधानसभा निवडणुकीत ज्या पक्षाच्या जागा सर्वाधिक निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली आहे. पण याचवेळेस त्यांनी भाजपलाच जास्त जागा मिळतील आणि देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होतील,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. उल्हासनगरमधील गोल मैदानात आठवले यांनी सोमवारी (9 सप्टेंबर)जाहिर सभा घेतली. त्यावेळेस ते बोलत होते.

(वाचा :भाजपमध्येही बंडखोरीची लागण, या दिग्गज मंत्र्यांची डोकेदुखी वाढणार!)

Loading...

शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद मिळू शकतं - आठवले

दरम्यान, दुसरीकडे त्यांनी शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद मिळू शकतं, असेही म्हटलं. यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील तोच अंतिम असेल, असंही विधान त्यांनी केलं. शिवाय, जागावाटपात अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला यशस्वी होणार नाही, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली.

तसंच युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंसोबत मी उभा आहे त्यामुळे यांची अवस्था राहुल गांधींसारखी होणार नाही, असं म्हणत आठवलेंनी आदित्य यांचं कौतुक देखील केलं.

(वाचा :बैठक संपल्यानंतर उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी दिली 'ही' माहिती)

आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचं असेल तर शिवसेनेनं तो मुद्दा रेटून धरला पाहिजे. असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. शिवसेनेनं जर असं केलं नाही तर आदित्य ठाकरेंचा राहुल गांधी व्हायला वेळ लागणार नाही, असंही ते म्हणाले होते.

(वाचा : 'युती'चे नाराज नेते संपर्कात, काँग्रेसच्या 'या' बड्या नेत्याचा गौप्यस्फोट)

पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसची काय आहेत वैशिष्ट्य? पाहा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2019 07:11 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...