भाजपचा संकल्प, सावरकरांना भारतरत्न मिळावा यासाठी पाठपुरावा करणार

भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी 16 कलमी संकल्पपत्र प्रकाशित केलं. यामध्ये सावरकरांसह महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनाही भारतरत्न मिळावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं भाजपने म्हटलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 15, 2019 12:12 PM IST

भाजपचा संकल्प, सावरकरांना भारतरत्न मिळावा यासाठी पाठपुरावा करणार

मुंबई, 15 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून आश्वासनांची खैरात केली जात आहे. भाजपने आज त्यांचे संकल्पपत्र प्रकाशित केलं आहे. 16 कलमी संकल्पपत्रात भाजपने दुष्काळमुक्ती, पाणी, रोजगार, शिक्षण आणि आर्थिक विकास या मुद्यांवर भर दिला आहे. संपन्न, समृद्ध आणि समर्थ महाराष्ट्राचे संकल्पपत्र अशी टॅगलाईन वापरून भाजपने 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी संकल्पपत्र प्रकाशित केलं.

भाजपने जाहीर केलेल्या संकल्पपत्रात एक महत्वाचं आश्वासन दिलं आहे. या मुद्यावरून पुन्हा वातावरण तापण्याची शक्यता आहे. भाजपने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं म्हटलं आहे. भाजप आणि शिवसेना दोघांनीही याआधीपासूनच सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी वारंवार केली आहे.

राजस्थानमध्ये काँग्रेस सरकारने अभ्यासक्रमामधून सावरकरांसाठी वीर हा शब्द वगळला होता. तसेच सावरकर यांनी तुरुंगातील त्रासाला कंटाळून ब्रिटीश सरकारकडं माफीनामा सादर केल्याचं पुस्तकात म्हटलं होतं. याशिवाय त्यांचा गांधी हत्येच्या कटात सहभाग असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्यावरून बराच वादंग झाला होता. दरम्यान, हिंदू महासभेनं नोटेवर गांधींजींऐवजी सावरकरांचा फोटो छापावा अशी मागणीही केली होती. या पार्श्वभूमीवर आता भाजपने स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिल्यानं हा मुद्दा पुन्हा गाजण्याची शक्यता आहे.

नवमहाराष्ट्राचा संकल्प करताना भाजपने महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासह स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचंही संकल्पपत्रात म्हटलं आहे. राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी 620 कोटींची तरतूद करण्यात येईल असंही या संकल्पपत्रात म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक लवकरच पूर्ण करू असंही आश्वासनं दिलं आहे.

Loading...

VIDEO : भाजप पुन्हा सत्तेत आल्यास तुम्हाला काय मिळणार? जाणून घ्या 1 मिनिटात संकल्पपत्रातील मुद्दे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 15, 2019 12:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...