Opinion Poll : निवडणूकपूर्व चाचणीत 'युती'ला मोठी 'आघाडी', युती तुटली तर मिळतील इतक्या जागा

Opinion Poll : निवडणूकपूर्व चाचणीत 'युती'ला मोठी 'आघाडी', युती तुटली तर मिळतील इतक्या जागा

निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातल्या निवडणुकीची तारीख जाहीर केली त्याच दिवशी काही निवडणूकपूर्व अंदाज जाहीर झाले आहेत.

  • Share this:

मुंबई, 21 सप्टेंबर : निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातल्या निवडणुकीची तारीख जाहीर केली त्याच दिवशी काही निवडणूकपूर्व अंदाज जाहीर झाले आहेत. आता महाराष्ट्राची सत्ता कोण काबीज करणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. युतीची समीकरणं अद्याप जमली नसली, तरी युती झाली तर त्यांनाच स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज  बहुतेक सर्व सर्व्हे नोंदवत आहेत. एकत्र लढल्यास 288 पैकी 205 जागा युतीला मिळणार असं सी व्होटर आणि ABP माझाचा ओपिनियन पोल सांगतो तर TV 9 च्या अंदाजानुसार युतीला 217 जागा आणि आघाडीला 60 जागा मिळतील असं सांगण्यात येत आहे.

सीव्होटरचं सर्वेक्षण

एबीपी माझा आणि सीव्होटर यांनी केलेल्या सर्वेक्षणात 205 जागा युतीला,  55 आघाडीला आणि इतरांना 28 जागा मिळतील असा अंदाज आहे.

संबंधित - दिवाळीपूर्वीच महाराष्ट्रात राजकीय फटाके, निवडणूक तारखांची झाली घोषणा

वाचा - ओपिनियन पोलमध्ये मनसेला भोपळा, युती-आघाडीच्या गणितात 'वंचित'चं काय?

युती न झाल्यास भाजपला 144, शिवसेनेला 39, काँग्रेसला 21 तर राष्ट्रवादीला 20जागा मिळतील असा कल या मतचाचणीत वर्तवण्यात आला आहे.

टीव्ही  9 मराठीचा सर्व्हे काय सांगतो?

TV9 मराठीने केलेल्या सर्वेक्षणात 217 जागा युतीला देण्यात आल्या आहेत. आघाडीला 60 तर इतरांना  11 जागा मिळतील असा अंदाज या सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे. विभागवार सर्व्हे अंदाजही त्यांनी व्यक्त केले आहेत.

प्रदेश               - एकूण     - युती    - आघाडी

उत्तर महाराष्ट्र    -  35       -  26       - 8

मराठवाडा       -   48        - 39        - 6

विदर्भ                - 62      -  51         - 11

हे वाचा - 'मेकअप'मुळे काँग्रेसच्या प्रणिती शिंदे अडचणीत, आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार!

आघाडीला चितपट करत सत्ता राखण्याचं महायुतीसमोर आव्हान असणार आहे, तर युतीला धक्का देत राजकीय कमबॅक करण्याचा आघाडीचा प्रयत्न असणार आहे.

मागील विधानसभेत काय होती स्थिती?

मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली आणि आघाडीनेही काडीमोड घेतला. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. तर शिवसेनेलाही समाधानकारक जागा मिळाल्या होत्या.

हेही वाचा -  निवडणूक जाहीर होताच भाजप-सेना युतीला मोठा धक्का, काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग

या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला अँटी एन्क्मबन्सीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे राज्यात 15 वर्षांपासून असलेली सत्ता आघाडीने गमावली. या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेला 145 जागांचा जादुई आकडा गाठता आला नाही. त्यामुळे नंतर भाजप-शिवसेनेनं पुन्हा एकत्र येत युतीचे सरकार स्थापन केलं.

महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण जागा आणि 2014 चं पक्षीय बलाबल

एकूण जागा - 288

भाजप - 122

शिवसेना - 63

काँग्रेस - 42

राष्ट्रवादी - 41

कोणत्या विभागात कोणत्या पक्षाची काय होती स्थिती?

पश्चिम महाराष्ट्र

एकूण जागा - 58

भाजप - 19

शिवसेना - 12

काँग्रेस - 7

राष्ट्रवादी - 16

इतर - 4

उत्तर महाराष्ट्र

एकूण जागा - 47

भाजप - 19

शिवसेना - 8

काँग्रेस - 10

राष्ट्रवादी - 8

इतर - 2

मराठवाडा

एकूण जागा - 46

भाजप - 15

शिवसेना - 11

काँग्रेस - 9

राष्ट्रवादी - 8

इतर - 3

विदर्भ

एकूण जागा - 62

भाजप - 44

शिवसेना - 4

काँग्रेस - 10

राष्ट्रवादी - 1

इतर - 3

कोकण

एकूण जागा - 75

भाजप - 25

शिवसेना - 28

काँग्रेस - 6

राष्ट्रवादी - 8

इतर - 8

VIDEO : निवडणुकीच्या तारखा जाहीर, मुख्यमंत्र्यांनी केलं 'हे' आवाहन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2019 07:08 PM IST

ताज्या बातम्या