विधानसभेत शिवसेनेची अडचण होणार? मित्रपक्षांच्या मदतीने भाजप सोडणार 'इतक्याच' जागा

विधानसभेत शिवसेनेची अडचण होणार? मित्रपक्षांच्या मदतीने भाजप सोडणार 'इतक्याच' जागा

विधानसभा निवडणुकीत जागावाटपाबाबत भाजपचा एक नवा प्रस्ताव समोर आला आहे.

  • Share this:

मुंबई, 26 ऑगस्ट : काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आपल्या गोटात खेचत भाजप-शिवसेनेनं विधानसभेसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. मात्र त्याचवेळी मुख्यमंत्रिपदाच्या महत्त्वाकांक्षेमुळे युतीतच तणाव निर्माण होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे आगाी निवडणुकीत जागावाटपावरून भाजप-शिवसेनेत खडाजंगी होणार असल्याचीही चर्चा आहे. अशातच आता जागावाटपाबाबत भाजपचा एक नवा प्रस्ताव समोर आला आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपकडून शिवसेनेला 120 ते 125 जागांचा प्रस्ताव देण्यात येण्याची शक्यता आहे. तसंच मित्रपक्षांसह भाजप 163 ते 168 जागांवर निवडणूक लढू शकते. याबाबत 'लोकमत'ने वृत्त दिलं आहे. निवडणुकीसाठी भाजप याच प्रस्तावासाठी आग्रही राहिल्यास शिवसेनेची चांगलीच अडचण होऊ शकते.

मागील निवडणुकीत शिवसेनेनं जिंकलेल्या 63 जागा आणि त्यात अजून तितक्याच जागांची भर टाकत शिवसेनेला 125 पर्यंतच्या जागा सोडण्याचा भाजपचा विचार आहे. त्यामुळे या प्रस्तावाला शिवसेना कसा प्रतिसाद देते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत देशभरात भाजपला घवघवीत यश मिळालं. महाराष्ट्रातही भाजप-शिवसेना युतीने विरोधकांचा धुव्वा उडवला. पण आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये अंतर्गत स्पर्धा सुरू असल्याचं दिसत आहे. अशातच काही दिवसांपूर्वी निवडणुकीसाठीचा भाजपचा सर्व्हे समोर आला होता.

शिवसेनेकडून युवा नेते आदित्य ठाकरे यांना राज्याच्या राजकारणात बळ दिलं जात आहे. आगामी निवडणुकीत आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणूनही शिवसेनेकडून प्रोजेक्ट केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने केलेला सर्व्हे शिवसेनेची डोकेदुखी वाढवणारा ठरला. कारण विधानसभेत स्वबळावर लढूनही भाजपला बहुमत मिळू शकतं, असा अंदाज या सर्व्हेतून व्यक्त करण्यात आला होता.

काय होतं भाजपच्या सर्व्हेत?

'विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना यांनी युती केल्यास आणि काँग्रेस-राष्ट्रवादीही सोबत लढल्यास युतीला 200 जागा मिळतील तर आघाडीच्या वाट्याला 88 जागा येतील. पण युती तुटून स्वबळावर लढल्यास भाजपला 160, शिवसेना 90 तर काँग्रेस-राष्ट्रवादी 38 जागांपर्यंत थांबेल. तसंच आघाडीत बिघाडी झाल्यास आणि शिवसेना-भाजप मात्र सोबत लढल्यास युतीला 230 जागांवर विजय मिळेल आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला मात्र केवळ 58 जागांवर समाधान मानावं लागेल,' अशी आकडेवारी भाजपच्या सर्वेतून समोर आली होती.

मुख्यमंत्री कुणाचा, भाजप-सेनेत कुरघोडी

मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्रिपदाबाबत दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर कुरघोडी करत आहे. एकीकडे भाजपचे नेते मुख्यमंत्रिपदावर आमचाच माणूस बसेल, असं सांगत आहेत तर दुसरीकडे शिवसेनादेखील मुख्यमंत्रिपदावर आपला दावा सांगत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपर्यंत आमचं ठरलंय, असं सांगत असताना मात्र दोन्ही पक्षाचे नेते मुख्यमंत्री आमचाच होईल, असा दावा करत आहे. त्यामुळे अखेर सेना-भाजपचे ठरलं तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मटकी फुटली अन् गोविंदा थेट वरच्या थरावरून जमिनीवर पडला, VIDEO व्हायरल

First published: August 26, 2019, 11:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading