मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख ठरली, भाजप देणार शिवसेनेला धोबीपछाड!

मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख ठरली, भाजप देणार शिवसेनेला धोबीपछाड!

शिवसेना सोबत आली तर त्यांच्याबरोबर अन्यथा भाजपाचा एकट्याचा शपथविधी करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 01 नोव्हेंबर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्यानंतर सत्ता स्थापनेवरून युतीमध्ये वाद सुरू आहे. भाजप आणि सेनेत पडलेल्या सत्तेच्या ठिणगीमध्ये आता भाजपने 'एकला चलो रे'ची भूमिका मांडली आहे. मंगळवारी 5 नोव्हेंबर रोजी वानखेडे स्टेडियमवर भाजपा मंत्रीमंडळाचा शपथविधी समारंभ पार पडणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली आहे. शिवसेना सोबत आली तर त्यांच्याबरोबर अन्यथा भाजपाचा एकट्याचा शपथविधी करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे.

या शपविधी कार्यक्रमाची सर्व जबाबदारी आमदार प्रसाद लाड आणि चंद्रकांत देसाई यांच्याकडे देण्यात आली आहे. 2014 प्रमाणेच सत्तास्थापन करण्याची भाजपाची तयारी असल्याचं सांगण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या 5 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी शपथविधी समारंभ आयोजित करण्याचं निश्चित केलं आहे. हा समारंभ वानखेडे स्टेडियम येथेच पार पडणार आहे. त्यामुळे आता यावर सेनेची काय भूमिका असणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

भाजपचा या शपथविधी समारंभाची भव्य तयारी करण्यात येणार आहे. 2014 साली मुख्यमंत्र्यांसह भाजपाच्या प्रमुख 10 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला होता. शिवसेना त्यानंतर दीड महिन्यांनी सरकारमध्ये सहभागी झाली होती. त्यामुळे आता शिवसेना काय भूमिका घेणार की त्यांच्या मतावर ठाम राहणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. यावेळी शिवसेना बरोबर आली तर ठीक अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या काही प्रमुख मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.

इतर बातम्या - सत्ता स्थापनेविषयी पवारांची भविष्यवाणी, वाद सोडवण्यासाठी दिला पर्याय!

शिवसेनेसोबत सत्तासंघर्ष सुरू असतानाच अमित शहांनी भाजप नेत्यांना पाठवला 'हा' संदेश

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. निवडणुकीत युतीत लढणारे शिवसेना आणि भाजप निकालानंतर मात्र एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. कोणाला कोणतं खातं मिळणार आणि मुख्यमंत्री कोणाचा होणार, यावरून दोन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

इतर बातम्या - सेनेचं सरकार स्थापनेचं स्वप्न भंगणार, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिला धक्का

महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेत चाललेला संघर्ष हा मुख्यमंत्रिपदासाठी नसून चांगली खाती मिळावीत यासाठी असल्याची माहिती आहे. नगर विकास, गृह यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांवर शिवसेनेनं दावा सांगितला आहे. म्हणूनच भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. हा तिढा सुटत नसतानाच भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना संदेश पाठवला आहे.

सत्ता स्थापनेचं गणित सोडवण्यासाठी अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर येणार होते. मात्र अचानक शहा यांचा हा दौरा रद्द झाला आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी राज्य स्तरावर यातून मार्ग काढावा, असं अमित शहांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेला कोणता नवा प्रस्ताव देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

इतर बातम्या - 'काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्याचा विचार कसा करू शकते?'

'लिहून घ्या, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार'

एकीकडे सत्ता वाटपाबाबत भाजप शिवसेनेत बोलणी पूर्ण झाली नसतानाच संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 'लिहून घ्या, मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार आहे' असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. मुंबईमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तावाटपावरून भाजप-शिवसेनेत वाद सुरू असतानाच एकीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावरही संजय राऊत यांनी मोठा खुलासा केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2019 01:40 PM IST

ताज्या बातम्या