सोलापुरात पालकमंत्र्यांच्या समर्थकाला बेदम मारहाण, राजकीय वैमनस्यातून हल्ला?

सोलापुरात पालकमंत्र्यांच्या समर्थकाला बेदम मारहाण, राजकीय वैमनस्यातून हल्ला?

विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर राजकीय वैमनस्यातून ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

  • Share this:

सागर सुरवसे, सोलापूर, 23 ऑक्टोबर : भाजप नेते आणि सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या समर्थकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आनंद चंदनशिवे यांच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सोलापूर शहरातील बाळे इथं विजयकुमार देशमुख यांचे खंदे समर्थक राजू आलुरे यांना काही तरूणांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या राजू आलुरे यांना नंतर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर राजकीय वैमनस्यातून ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

पिंपरीतही झाला होता राडा

विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत असताना (सोमवारी) पिंपरी चिंचवड़मध्ये मोठा राडा झाला. राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. याप्रकरणी राष्ट्रवादीचे नगरसेवक डब्बू आसवानी यांना अटक करण्यात आली आहे. तसंच याच राड्याप्रकरणी शिवसेनेचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांचे जावई बबलू सोनकरसह इतर चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

मतदान सुरू असताना बबलू सोनकर आणि त्यांचे कार्यकर्ते पिंपरी परिसरात फिरत होते. सोनकर हे दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास आसवानी यांच्या घराजवळून जात होते. त्यावेळी आसवानी आणि त्यांच्या साथीदारांनी सोनकर यांची मोटार अडवली आणि त्याला लाकडी बांबू, सिमेंटचे गट्टू यांनी मारहाण केली.

या मारहाणीत सोनकर आणि कार्यकर्ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी आमदार आसवानी यांच्याविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे. तर दुसरीकडे, डब्बू आसवानी यांनीही बबलू सोनकर आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध तक्रार दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उदयनराजेंसारखी कॉलर उडवत 'या' नेत्याने काढली निकालाआधीच मिरवणूक, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 23, 2019 09:01 AM IST

ताज्या बातम्या