चंद्रकांत पाटलांची गाडी अडवण्याचा प्रयत्न, कार्यकर्ते आक्रमक

चंद्रकांत पाटलांची गाडी अडवण्याचा प्रयत्न, कार्यकर्ते आक्रमक

मुंबईतील A9 या शासकीय बंगल्यासमोर चंद्रकांत पाटील यांची गाडी रोखण्याचा कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला आहे.

  • Share this:

मुंबई, 2 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या उमेदवार यादीची घोषणा केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासमोर पक्षातील बंडखोरी थांबवण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं आहे. मुंबईतील A9 या शासकीय बंगल्यासमोर चंद्रकांत पाटील यांची गाडी रोखण्याचा कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला आहे.

भाजपने यंदाच्या निवडणुकीत आतापर्यंत 12 विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं आहे. त्यातच आता उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव यांचे समर्थक चंद्रकांत पाटलांसमोर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. चंद्रकांत पाटलांच्या गाडीसमोर ठिय्या करण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला आहे.

चंद्रकांत पाटलांसमोर घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी हटवलं. त्यानंतर पाटील यांनी कशीबशी वाट काढत काढता पाय घेतला. त्यानंतर आता चंद्रकांत पाटील पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर भाजपची डोकेदुखी वाढली आहे. कारण तिकीट न मिळालेल्या नेत्यांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे.

हेही वाचा- भाजपच्या उमेदवार यादीत मुलं, मुली, भाचे, सुना आणि जावई

युतीतील बंडखोरांनी आता आघाडीशी जवळीक केल्याचंही पाहायला मिळत आहे. तर काही बंडखोरांनी अपक्ष लढण्याची तयारी केली आहे.

नाशिकमधील दोन माजी आमदार आघाडीच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. यामध्ये वसंत गीते आणि माणिकराव कोकाटे यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे नाशिकमधील शिवसेनेचे ताकदवान नेते संतोष शिंदे हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.

भाजपच्या महिला आमदारानी नाकारली राज ठाकरे-अजित पवारांची ऑफर, दिलं हे उत्तर

Published by: Akshay Shitole
First published: October 2, 2019, 12:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading