मतदानाआधी भाजपच्या अंतर्गत सर्व्हेने खळबळ ; धनंजय मुंडे, रोहित पवार फ्रंटफूटवर?

मतदानाआधी भाजपच्या अंतर्गत सर्व्हेने खळबळ ; धनंजय मुंडे, रोहित पवार फ्रंटफूटवर?

भाजपच्या अंतर्गत सर्व्हेनुसार, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काही मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीकडून जोरदार आव्हान निर्माण झालं आहे.

  • Share this:

मुंबई, 17 ऑक्टोबर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक रंगतदार स्थितीत असलेली पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या मतदानासाठी मोजकेच काही दिवस बाकी असताना युती आणि आघाडीमध्ये चुरशीची लढत होणार असल्याचं दिसत आहे. अशातच अनेकांकडून या निवडणुकीच्या निकालाबाबत अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. भाजपचाही एक अंतर्गत सर्व्हे समोर आला आहे.

भाजपच्या अंतर्गत सर्व्हेनुसार, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काही मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीकडून जोरदार आव्हान निर्माण झालं आहे. भाजप लढत असलेल्या तब्बल 40 जागांवर विरोधकांकडून कडवी झुंज दिली जात असल्याचं भाजपच्याच सर्व्हेतून समोर येत आहे. यामध्ये परळीतून पंकजा मुंडे आणि कर्जत जामखेड मतदारसंघातू राम शिंदे यांच्यासाठी ही निवडणूक अवघड जात असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे परळीत राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे आणि कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवार यांच्याकडून चांगली टक्कर दिली आहे, असं भाजपच्या अंतर्गत सर्व्हेतून समोर आल्याची माहिती आहे. याबाबत 'एबीपी माझा' या मराठी वाहिनीने वृत्त दिलं आहे.

'40 जागांवर अटीतटीची लढत'

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा झाली तेव्हा ही निवडणूक एकतर्फी होईल, असा अंदाज अनेक राजकीय विश्लेषकांकडून बांधण्यात येत होता. मात्र मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसं अनेक मतदारसंघात आघाडी आणि युतीमध्ये चुरस निर्माण होताना दिसत आहे. भाजपच्या अंतर्गत सर्व्हेनुसार 40 जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून काँटे की टक्कर दिली जात आहे. त्यामुळे या जागांवर युती आणि आघाडीत हायहोल्टेज मुकाबला पाहायला मिळणार आहे.

'122 जागांवर मिळणार विजय'

विधानसभेच्या 40 जागांवर अटीतटीची लढत होताना दिसत असली तरीही आपण 122 जागांवर विजय मिळवू असा आत्मविश्वास भाजपला आहे. याबाबत भाजपच्या अंतर्गत सर्व्हेतून माहिती समोर आल्याचं पक्षाचं म्हणणं आहे. असं असलं तरीही भाजपकडून या सर्व्हेबद्दल आतापर्यंत कोणीही माध्यमांसमोर येऊन बोललेलं नाही.

VIDEO : 'देवेंद्र फडणवीस ठरवणार उपमुख्यमंत्री', पाहा काय म्हणाले अमित शाह

First published: October 17, 2019, 3:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading