निवडणुकीसाठी भाजपचा अंतर्गत सर्व्हे तयार, शिवसेनेचं टेन्शन वाढवणारे आकडे समोर

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये अंतर्गत स्पर्धा सुरू असल्याचं दिसत आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 28, 2019 03:53 PM IST

निवडणुकीसाठी भाजपचा अंतर्गत सर्व्हे तयार, शिवसेनेचं टेन्शन वाढवणारे आकडे समोर

मुंबई, 28 जुलै : लोकसभा निवडणुकीत देशभरात भाजपला घवघवीत यश मिळालं. महाराष्ट्रातही भाजप-शिवसेना युतीने विरोधकांचा धुव्वा उडवला. पण आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये अंतर्गत स्पर्धा सुरू असल्याचं दिसत आहे. अशातच आता निवडणुकीसाठीचा भाजपचा सर्व्हे समोर आला आहे.

शिवसेनेकडून युवा नेते आदित्य ठाकरे यांना राज्याच्या राजकारणात बळ दिलं जात आहे. आगामी निवडणुकीत आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणूनही शिवसेनेकडून प्रोजेक्ट केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने केलेला सर्व्हे शिवसेनेची डोकेदुखी वाढवणारा आहे. कारण विधानसभेत स्वबळावर लढूनही भाजपला बहुमत मिळू शकतं, असा अंदाज या सर्व्हेतून व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील एका कॅबिनेट मंत्र्याने या सर्व्हेची माहिती दिली. याबाबत 'टाईम्स ऑफ इंडिया' या दैनिकाने वृत्त प्रकाशित केलं आहे.

काय आहे भाजपच्या सर्व्हेत?

'विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना यांनी युती केल्यास आणि काँग्रेस-राष्ट्रवादीही सोबत लढल्यास युतीला 200 जागा मिळतील तर आघाडीच्या वाट्याला 88 जागा येतील. पण युती तुटून स्वबळावर लढल्यास भाजपला 160, शिवसेना 90 तर काँग्रेस-राष्ट्रवादी 38 जागांपर्यंत थांबेल. तसंच आघाडीत बिघाडी झाल्यास आणि शिवसेना-भाजप मात्र सोबत लढल्यास युतीला 230 जागांवर विजय मिळेल आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला मात्र केवळ 58 जागांवर समाधान मानावं लागेल,' अशी आकडेवारी भाजपच्या सर्वेतून समोर आल्याचं सरकारमधील एका मंत्र्यानं सांगितलं आहे.

मुख्यमंत्री कुणाचा, भाजप-सेनेत कुरघोडी

Loading...

मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्रिपदाबाबत दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर कुरघोडी करत आहे. एकीकडे भाजपचे नेते मुख्यमंत्रिपदावर आमचाच माणूस बसेल, असं सांगत आहेत तर दुसरीकडे शिवसेनादेखील मुख्यमंत्रिपदावर आपला दावा सांगत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपर्यंत आमचं ठरलंय, असं सांगत असताना मात्र दोन्ही पक्षाचे नेते मुख्यमंत्री आमचाच होईल, असा दावा करत आहे. त्यामुळे अखेर सेना-भाजपचे ठरलं तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

'सत्तेचा गैरवापर करून नेत्यांना फोडण्याचं राजकारण', पाहा शरद पवारांची UNCUT पत्रकार परिषद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 28, 2019 03:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...