उदयनराजेंना भाजपच्याच इच्छुकांनी दिला धक्का? साताऱ्यात रंगलं पक्षांतर्गत राजकारण

उदयनराजे भोसले यांच्यासाठी हा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 21, 2019 04:44 PM IST

उदयनराजेंना भाजपच्याच इच्छुकांनी दिला धक्का? साताऱ्यात रंगलं पक्षांतर्गत राजकारण

संदीप राजगोळकर, सातारा, 21 सप्टेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र उदयनराजे भोसले यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीची मात्र घोषणा करण्यात आलेली नाही. उदयनराजे भोसले यांच्यासाठी हा धक्का असल्याचं बोललं जात आहे. मात्र या निमित्ताने साताऱ्यातील भाजपमधील राजकारणाचीही जोरदार चर्चा होत आहे.

भाजपच्या सातारा जिल्ह्यातील नेत्यांनाच सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणूक एकत्रित नको होती. उदयनराजेविरोधी जनमताचा आपल्याला फटका नको, असं काही इच्छुक उमेदवारांचं मत होतं. याबाबत भाजप नेत्यांनी मतदारसंघनिहाय आकडेवारीही दिली होती. इतर इच्छुकांसह शिवेंद्रसिंहराजे भोसले हे सुद्धा एकत्र निवडणुकीला तयार नव्हते. याबाबत सूत्रांनी माहिती दिली आहे. त्यामुळे सातारा पोटनिवडणुकीच्या मुद्द्यावर भाजपमध्येच राजकारण रंगल्याचं दिसत आहे.

उदयनराजे भोसले आणि साताऱ्यातील राजकारण :

खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. उदयनराजे यांना आपल्या लोकसभा सदस्यत्वाचाही राजीनामा द्यावा लागला.

उदयनराजे भोसले यांनी प्रवेशावेळी भाजपसमोर काही अटी ठेवल्याची माहिती आहे. यामध्ये विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणूक घ्यावी असा आग्रह उदयनराजेंनी धरला होता. आता निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र विधानसभेची घोषणा केली आहे. मात्र सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेसोबत होणार नाही. त्यामुळे उदयनराजेंना हा धक्का मानला जात आहे.

Loading...

उदयनराजेंच्या विरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते सज्ज

सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आलेली नाही. असं असलं तरीही आतापासूनच उदयनराजे भोसले यांच्याविरोधात लोकसभेची पोटनिवडणूक लढण्यासाठी राष्ट्रवादीतून 4 दिग्गजांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार आणि नेते शशिकांत शिंदे यांचा आपल्या कोरेगाव मतदारसंघासह साताऱ्यातील इतर भागातही चांगला प्रभाव आहे. त्यामुळे उदयनराजेंविरोधात लढण्यासाठी शशिकांत शिंदे यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे. तसंच माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, नितीन लक्ष्मणराव पाटील, अविनाश मोहिते यांची नावंही राष्ट्रवादीकडून चर्चेत आहेत.

VIDEO : निवडणुकीच्या तारखा जाहीर, मुख्यमंत्र्यांनी केलं 'हे' आवाहन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2019 04:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...