मावळ आणि पिंपरीमध्ये अखेरच्या क्षणी बदललं चित्र, भाजप बंडखोरांची माघार

मावळ आणि पिंपरीमध्ये अखेरच्या क्षणी बदललं चित्र, भाजप बंडखोरांची माघार

मावळ तालुक्यातील लढत तिरंगी होणार अशी जोरदार चर्चा होती.

  • Share this:

आनिस शेख/गोविंद वाकडे, मावळ, 7 ऑक्टोबर : मावळ विधानसभा निवडणुकीसाठी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. भारतीय जनता पक्षातूनच बंडखोरी करत माजी आमदार दिगंबर भेगडे यांचे पुतणे तसेच मावळ प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत निवडणूक अर्ज दाखल केला होता. मात्र आता त्यांनी माघार घेतली आहे.

मावळ तालुक्यातील लढत तिरंगी होणार अशी जोरदार चर्चा असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे यांच्यासोबत भेगडे यांची बैठक झाली. त्यानंतर आज अचानक रविंद्र भेगडे यांनी मावळ तालुक्यातून निवडणूक लढविण्याचा इरादा बदलून आता लढायचं नाही तर लढवायचं असं म्हणत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

भेगडे यांनी तळेगाव येथील भारतीय जनता पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन यापुढे पक्षाशी एकनिष्ठ असून पक्षाच्या वाढीसाठी काम करणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे आता तालुक्यातील लढत भारतीय जनता पक्षाकडून राज्यमंत्री बाळा भेगडे तर राष्ट्रवादी काँग्रेस कडून सुनील शेळके अशी रंगतदार लढत होणार आहे. सुनील शेळके यांच्याकडून करण्यात आलेल्या दमदार शक्तिप्रदर्शनानंतर बाळा भेगडे यांनी सुनील शेळके यांना शह देत रवींद्र भेगडे यांची घरवापसी केली आहे. दररोज घडत असलेल्या नवनवीन घडामोडींमुळे तालुक्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून निवडणुकीची उत्कंठा मतदार राजाला लागली आहे.

पिंपरीत मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईला यश

मुख्यमंत्री आणि चंद्रकात पाटील ह्यांच्या शिष्टाई फळाला आली आहे. पिंपरी मतदार संघात बंडखोरी करणारे भाजपचे नेते आणि अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, भीमा बोबडे आणि RPI च्या चंद्रकांता सोनकांबळे यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता शिवसेने तर्फे गौतम चाबुकस्वार, वबुआ चे बाळासाहेब गायकवाड आणि राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांच्यात चुरशीची लढत होणार आहे.

Published by: Akshay Shitole
First published: October 7, 2019, 3:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading