उमेदवारांची यादी जाहीर होताच भाजप अडचणीत, 'या' जागांवर बंडखोरीची शक्यता

उमेदवारांची यादी जाहीर होताच भाजप अडचणीत, 'या' जागांवर बंडखोरीची शक्यता

भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग झालंय. त्यामुळे एका मतदारसंघात इच्छुकांची संख्याही वाढली आहे. 'युती' झाल्यामुळे मित्रपक्षांना जागा सोडाव्या लागल्याने या बंडोबांना शांत करण्याचं आव्हान भाजप नेत्यांसमोर आहे.

  • Share this:

मुंबई 01 ऑक्टोंबर : गेली काही दिवस सगळ्यांनाच उत्सुकता होती ती 'युती'च्या घोषणेची आणि जागावाटपाची. शेवटी चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतर भाजप आणि शिवसेनेने अखेर पत्रक काढून  'युती'ची घोषणा केली आण नंतर यादीही. आणि जे व्हायचं तेच झालं. अनेक मतदार संघामध्ये बंडखोरांचं निशान फडकलं. येत्या काही दिवसांमध्ये ही बंडखोरी थंड झाली नाही तर भाजपची अडचण होण्याची शक्यता आहे. लोकसभेतल्या ऐतिहासिक यशामुळे भाजपच्या विजयाची शक्यता जास्त असल्याचं स्पष्ट झाल्यानं सर्वच पक्षातल्या नेत्यांचं भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग झालंय. त्यामुळे एका मतदारसंघात इच्छुकांची संख्याही वाढली आहे. 'युती' झाल्यामुळे मित्रपक्षांना जागा सोडाव्या लागल्याने या बंडोबांना शांत करण्याचं आव्हान भाजप नेत्यांसमोर आहे.

भाजपच्या पहिल्या यादीतले 'हे' आहेत नवीन चेहेरे!

कोथरूड

कोथरूडची निवडणूक यंदा लक्षवेधी ठरणार आहे. भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी पक्की झाली आणि भाजपात धुसफूस सुरू झाली. विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी नाराज झाल्यात. इतर इच्छुक नाराज असले तरी तसं ते दाखवत नाहीत. कोथरूड चे माजी शिवेसेना आमदार चंद्रकांत मोकाटे अपक्ष म्हणून शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने ही जागा मित्र पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिलीय. पाटील यांच्या विरुद्ध विरोधीपक्ष एकच उमेदवार देण्याचीही शक्यता आहे.

गुहागर

गुहागर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडून उमेदवारी अर्ज घेतला. खबरदारी म्हणून निवडणुक अर्ज घेतल्याचं भाजप कार्यकर्त्यांनी सांगितलं. वरिष्ठ पातळीवरून कोणतीही  सूचना न आल्यामुळे गुहागरचे माजी आमदार डॉ. विनय नातू विधानसभा मतदार संघातून  गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत. विनय नातू यांच्या भूमिकेमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालीय.

मुख्यमंत्री फडणवीस यांना SCकडून धक्का; ऐन विधानसभा निवडणुकीत दाखल होणार खटला!

ठाणे

भाजपला ठाणे शहर मतदारसंघ दिल्यास शिवसैनिक भाजप उमेदवारासाठी काम करणार नाहीत असा इशारा ठाण्यातल्या आनंद मठात जमलेल्या शिवसैनिकांनी दिलाय. यावेळी शिवसैनिकांनी भाजपाविरोधात घोषणाबाजीही केलीय. त्यामुळे शिवसेनेचा गढ असलेल्या या भागात भाजपला प्रसारासाठी जागा देऊ नका असं शिवसेनेला वाटतंय.

लोहा

लोहा मतदारसंघ शिवसेनेला सोडल्याने भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना मोठा धक्का बसलाय. लोहा विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडून भाजपला मिळेल अशी त्यांना आशा होती. त्या जागेवर आपल्याला मुलाला तिकीट देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र लोहा ही जागा शिवसेनेकडेच कायम असून तिथे उमेदवारही त्यांनी निश्चित केलाय. त्यामुळे संतापलेल्या चिखलिकर यांनी शिवसेनेला धडा शिकविण्याची थेट धमकीच दिलीय.

भाजप उडवणार प्रचाराचा धुराळा, मोदी आणि शहांचा असा आहे 'मेगा प्लान'

खासदार प्रताप पाटिल चिखलीकर हे 2019 पर्यंत शिवसेनेचेच आमदार होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी सेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला आणि खासदारही झाले. याचा शिवसेनेला राग आल्याचं बोललं जातं. चिखलीकर यांनी सेनेशी गद्दारी केल्याने त्यांना धडा शिकविण्यासाठी सेनेने हट्टाने हा मतदारसंघ आपल्याकडेच ठेवला. शिवसेनेकडून लोह्यात मुक्तेश्वर धोंडगे यांचं तिकीट निश्चित मानलं जातंय.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 1, 2019, 6:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading