Elec-widget

भाजपच्या 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; 12 विद्यमान आमदारांचा पत्ता कट, पाहा पूर्ण लिस्ट

भाजपच्या 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; 12 विद्यमान आमदारांचा पत्ता कट, पाहा पूर्ण लिस्ट

निवडणूक आयोगाने विधानसभेच्या तारखा जाहीर केल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

  • Share this:

मुंबई, 01 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर या पहिल्या यादीमध्ये विद्यमान 12 आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. दरम्यान, नागपूर दक्षिण-पश्चिम- देवेंद्र फडणवीस, कोथरूड- चंद्रकांत पाटील, सातारा- शिवेंद्रराजे, कसबा- मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने विधानसभेच्या तारखा जाहीर केल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसने रविवारी 51 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामुळे आता भाजप कोणत्या उमेदवारांना रिंगणात उतरवणार याची चर्चा सुरू झाली आहे. या यादीमध्ये 12 महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.

Loading...

विधानसभा निवडणुकीच्या तोडांवर भाजपमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून अनेक दिग्गज नेत्यांची जोरदार इनकमिंग झाली. त्यामुळे भाजपने जर आयात नेत्यांना उमेदवारी दिली तर भाजपमध्ये अनेकांमध्ये नाराजीचा सूर दिसू शकतो.

महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा उमेदवारांच्या नावावर अंतिम निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. भाजपने केलेल्या सर्वेक्षणात निर्विवादपणे जिंकण्याची शक्यता असलेल्या उमेदवारांची यादी तयार करण्यात आली. तसेच ज्या ठिकाणी दोन उमेदवार स्पर्धेत आहेत, अशा जागांची वेगवेगळी यादी पंतप्रधान मोदी यांच्यासमोर ठेवण्यात आली होती. या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, पंकजा मुंडे उपस्थित होते.

इतर बातम्या - भाजपमध्ये बंडखोरी सुरू? तिकीट न मिळण्यावरून महिला आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात

288 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

- अधिसूचना - 27 सप्टेंबर.

- उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख - 4 ऑक्टोबर.

- उमेदवारी अर्ज छाननी - 5 ऑक्टोबर.

- उमेदवारी अर्ज माघार घेण्याची तारीख - 7 ऑक्टोबर

- उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी दोन पर्यवेक्षक पाठवणार

- 2 नोव्हेंबरपूर्वी निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण होणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 1, 2019 01:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...