महायुतीला बंडाळीचे ग्रहण.. भाजपच्या चार तर शिवसेनेच्या एका नेत्याची बंडखोरी

महायुतीला बंडाळीचे ग्रहण.. भाजपच्या चार तर शिवसेनेच्या एका नेत्याची बंडखोरी

नांदगाव विधानसभा मतदार संघात महायुतीलाही बंडाळीचे ग्रहण लागले आहे.

  • Share this:

बब्बू शेख,(प्रतिनिधी)

मनमाड, 6 ऑक्टोबर: नांदगाव विधानसभा मतदार संघात महायुतीलाही बंडाळीचे ग्रहण लागले आहे.महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास कांदे यांच्या समोर भाजपचे चार तर शिवसेनेचा एक असे एकूण 5 बंडखोर उमेदवाराने आव्हान उभे ठाकले आहे.

दोन वेळा उमेदवार पराभूत झाला असताना भाजप-शिवसेनेत जागांची अदलाबदल होणे अपेक्षित होते. नांदगावची जागा ही शिवसेनेच्या कोट्यात असली तरी येथे सलग दोन वेळा उमेदवारांचा पराभव झाला होता. ही जागा भाजपला मिळेल, या आशेवर नाशिक जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती मनीषा पवार, माजी आमदार संजय पवार, भाजपचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पंकज खताळ हे गेल्या एक वर्षापासून निवडणुकीच्या तयारीला लागले होते. तिकडे पालिकेतील शिवसेना गट नेते गणेश धात्रक यांना पक्ष आपल्यालाच उमेदवारी देईल, असे वाटत होते. त्यामुळे ते देखील कामाला लागले होते. मात्र जागांची अदलाबदल झाली नाही आणि त्यामुळे निवडणुकीची तयारीला लागलेल्या भाजपच्या तिन्ही इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. त्यांनी बंड पुकारला आहे. शिवसेनेने सुहास कांदे यांना उमेदवारी दिल्याचे पाहून नाराज झालेले गणेश धात्रक यांनी ही उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरी केली. उद्या, सोमवारी माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बंडखोरांना उमेदवारी मागे घेण्याचे आवाहन केले आहे. त्यात शिवसेनेने देखील बंडखोरी खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला आहे. आता भाजप व शिवसेनेचे बंडोबा या इशाऱ्यानंतर ही मैदानात राहतात की थंडोबा होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

CCTV VIDEO:हेल्मेट घालून भरदिवसा ICICI बँकेत दरोडा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 6, 2019 10:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading