Elec-widget

निमित्त व्याख्यानाचं पण डोळा विधानसभेवर, अमित शहांच्या दौऱ्यात रणनीती ठरणार

निमित्त व्याख्यानाचं पण डोळा विधानसभेवर, अमित शहांच्या दौऱ्यात रणनीती ठरणार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहांचा मुंबई दौरा चर्चेत आहे.

  • Share this:

मुंबई, 22 सप्टेंबर : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबई दौऱ्यावर आले आहेत. यावेळी ते कलम 370 बाबत एक व्याख्यानही देणरा आहेत. पण त्याचबरोबर नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहांचा मुंबई दौरा चर्चेत आहे.

लोकसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे युतीसाठी अनेकदा मातोश्रीवर गेले होते. त्यासोबतच लोकसभेच्या जागा वाटपाची अंतिम चर्चा करण्यासाठी अमित शहा तब्बल साडेतीन तास मातोश्रीवर होते. त्यानंतर युतीचा अंतिम फॉर्म्युला निश्चित करूनच अमित शहा मातोश्रीबाहेर पडले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्याच्या दिवशी मातोश्रीवर गेले होते, पण त्यानंतर मुख्यमंत्र्यांची मातोश्री भेट झालेली नाही. लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाला युती अत्यावश्यक होती आणि म्हणून भाजपने एक अतिरिक्त जागा शिवसेनेला देत 25 जागा भाजप आणि 23 जागा शिवसेना असा लोकसभेसाठीचा फॉर्म्युला तयार केला होता.

आता मात्र शिवसेना युतीसाठी ताटकळत बसली आहे, असं चित्र दिसत आहे आणि कोणताही भाजपचा मोठा नेता मातोश्रीवर गेलेला नाही. आजही अमित शहा मातोश्रीवर जाणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे युतीबाबतचा संभ्रम अधिकच वाढला आहे. मात्र असं असलं तरीही अमित शहा यांनी संध्याकाळी आपला वेळ राखून ठेवला असून सह्याद्री अतिथी गृहावर अमित शहा भाजपच्या निवडणूक रणनीतीबाबत महाराष्ट्रातील नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत.

कसा असेल अमित शहांचा मुंबई दौरा?

Loading...

- सकाळी 11.20 वाजता मुंबई विमानतळावर दाखल

- दुपारी 12 वाजता 370 कलमासंदर्भात व्याख्यानासाठी नेस्को संकुल गोरेगाव या कार्यक्रमस्थळी आगमन

- दुपारी 1.45 च्या सुमारास नवनियुक्त मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेपियनसी रोड येथील निवासस्थानी भेट

- त्यांनतर दुपारी 2.30 च्या सुमारास राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट

- संध्याकाळी चर्चगेट येथे जय हिंद कॉलेजच्या एका कार्यक्रमात उपस्थिती

- कार्यक्रमानंतर संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहावर राखीव वेळ ठेवण्यात आला आहे. (आगामी निवडणुकीच्या आढावा बैठका होऊ शकतात)

- आजच्या या कार्यक्रमानुसार अमित शाह यांची शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट ठरलेली नाही.

VIDEO: 'लफडी केली तर सहन करा'; राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांची पवारांनी घेतली फिरकी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 22, 2019 12:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...