एकनाथ खडसेंसह तावडेंचं तिकीट भाजपने कापलं, चौथी यादी जाहीर

भाजपने आपल्या चौथ्या यादीत सात जागांची घोषणा केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 4, 2019 11:29 AM IST

एकनाथ खडसेंसह तावडेंचं तिकीट भाजपने कापलं, चौथी यादी जाहीर

मुंबई, 4 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली चौथी यादी जाहीर केली आहे. यामध्ये पक्षाने मुक्ताईनगर मतदारसंघातून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं तिकीट कापत त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली आहे. तिकीट कापलं जाणं हा एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

भाजपने चौथ्या यादीत सात जागांची घोषणा केली आहे. यामध्येही एकनाथ खडसे यांच्यासह विनोद तावडे आणि प्रकाश मेहता यांना स्थान देण्यात आलेलं नाही. तर कुलाबामधून रामराजे निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर यांना संधी देण्यात आली आहे.

भाजपची चौथी यादी, कुणाला मिळाली संधी?

मुक्ताईनगर - रोहिणी खडसे

काटोल - चरणसिंह ठाकूर

Loading...

तुमसर - प्रदीप पडोले

नाशिक (पूर्व)- राहुल ढिकले

बोरिवली - सुनील राणे

घाटकोपर (पूर्वी) - पराग शाह

कुलाबा - राहुल नार्वेकर

अजित पवारांनी केला खडसेंशी संपर्क?

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात अनेक मोठ्या नेत्यांनी पक्षांतर केलं. काँग्रेसला धक्का देत राधाकृष्ण विखे पाटील बाहेर पडले तर राष्ट्रवादीतून गणेश नाईक आणि उदयनराजेंसह अनेक नेते भाजपमध्ये दाखल झाले. पण त्यानंतर आता सत्ताधारी भाजपलाच मोठं खिंडार पडू शकतं, अशी चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल आपला नियोजित बीड दौरा रद्द केला. त्यानंतर अजित पवार भाजपचे दिग्गज नेते आणि सध्या पक्षात नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांच्या भेटीसाठी जळगावला रवाना झाल्याचं बोललं जात होतं. याबाबत दोन्ही पक्षांनी अद्याप अधिकृत भाष्य केलेलं नाही. मात्र जर खरोखरच एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या संपर्कात असतील तर विधानसभा निवडणुकीना वेगळी कलाटणी मिळू शकते.

VIDEO: प्रशासनाच्या भोंगळ कारभार; कंबरेएवढ्या पाण्यातून अंत्ययात्रा काढण्याची वेळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 4, 2019 09:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...