भिवंडीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षाने सोडला पक्ष, चुरस वाढली

शहराध्यक्षांनी पक्ष सोडल्याने भाजप आणि राष्ट्रवादीला धक्का बसला आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 6, 2019 11:20 AM IST

भिवंडीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षाने सोडला पक्ष, चुरस वाढली

रवी शिंदे, भिवंडी, 6 ऑक्टोबर : भिवंडी शहरात  विधानसभा निवडणुकीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना-भाजपची युती झाल्यामुळे एकतर्फी वाटणाऱ्या भिवंडी पूर्व व पश्चिम मतदारसंघात निवडणुकीच्या वातावरणात शहराध्यक्षांनी पक्ष सोडल्याने भाजप आणि राष्ट्रवादीला धक्का बसला आहे.

भाजपचे शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांनी पक्षाला सोडचिट्ठी देत काँग्रेसशी घरोबा केला आहे. त्यामुळे युतीतर्फे निवडणूक लढणाऱ्या शिवसेना उमेदवार आमदार रुपेश म्हात्रे यांना आता काँग्रेसचे संतोष शेट्टीं यांचे मोठे आव्हान असून त्यांना हॅट्रिक साजरी करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. दुसरीकडे, काँग्रेस - राष्ट्रवादीची आघाडी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससाठी भिवंडी शहरातील एक तरी जागा द्यावी, अशी मागणी वेळोवेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह नेते मंडळींकडून करण्यात येत होती. मात्र काँग्रेसने भिवंडी पश्चिम मतदार संघातून शहर अध्यक्ष शोएब गुड्डू यांना उमेदवारी जाहीर केली होती तर भाजप शहराध्यक्ष असलेल्या संतोष शेट्टी यांना शेवटच्या क्षणाला भिवंडी पूर्व मधून काँग्रेसची उमेदवारी दिली गेली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांची खदखद उफाळून आली आणि अखेर राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष खालिद गुड्डू यांनी एमआयएम पक्षात प्रवेश केला आहे.

भाजप आणि राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षांनीच पक्षांतर केल्याने युतीत मिठाचा खडा पडला तर आघाडीत बिघाडी झाली आहे. त्यामुळे भिवंडीतील यंदाची निवडणूक चांगलीच रंगतदार होणार आहे.

VIDEO : राज्याचा मुख्यमंत्री हा मराठा असावा, मराठा क्रांती मोर्च्याची मागणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 6, 2019 11:20 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...