भाजपच्या मंदा म्हात्रेंना मोठा दिलासा, 'एकनाथ शिंदे फॅक्टर'ने बदललं समीकरण

भाजपच्या मंदा म्हात्रेंना मोठा दिलासा, 'एकनाथ शिंदे फॅक्टर'ने बदललं समीकरण

बेलापूरमधील भाजप उमेदवार मंदा म्हात्रे यांच्यासाठी हा मोठा दिलासा असणार आहे.

  • Share this:

नवी मुंबई, 14 ऑक्टोबर : नवी मुंबईतील दिग्गज नेते गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशानंतर बेलापूर मतदारसंघातील विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांची डोकेदुखी वाढली होती. मात्र त्यानंतर भाजपने गणेश नाईक यांना धक्का देत बेलापूरमधून मंदा म्हात्रे यांची उमदेवारी कायम ठेवली. पण शिवसेना उमेदवाराने बंडखोरी करत या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मंदा म्हात्रे यांच्यासमोर आव्हान निर्माण झालं होतं.

शिवसेना नेते आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर शिवसेना बंडखोर उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतली आहे. बेलापूर मतदार संघातील शिवसेनेचे बंडखोर उमेदवार विजय माने यांनी एकनाथ शिंदेच्या सांगण्यावरून उमेदवारी माघारी घेतली आहे. तसंच भाजपच्या उमेदवार मंदा म्हात्रेंना पाठिंबा जाहीरही केला आहे. त्यामुळे म्हात्रे यांच्यासाठी हा मोठा दिलासा असणार आहे.

गणेश नाईक आणि भाजपमधील प्रवेश

युतीच्या फॉर्मुल्यानुसार, नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर हे दोन्ही मतदार संघ भाजपला देण्यात आले आहेत. यानुसार ऐरोली मतदार संघातून गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र गणेश नाईक यांना भाजपने बेलापूरचा मतदारसंघ देण्यास अखेरच्या क्षणी नकार दिल्याने अखेर संदीप नाईक यांच्याऐवजी ऐरोलीतून गणेश नाईक यांनी लढण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, त्याआधी गणेश नाईक यांनी आपल्या कुटुंबातल्या इतर सदस्यांसह राष्ट्रवादीच्या 48 नगरसेवकांसोबत भाजपमध्ये प्रवेश केल्याने नवी मुंबईत राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं होतं. गेली 20 वर्ष नवी मुंबई महानगरपालिकेत गणेश नाईक यांनी एकहाती सत्ता ठेवली होती. मात्र 2015च्या मनपा निवडणुकीत त्यांना धक्का बसला. काँग्रेसची मदत घेत त्यांना पालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा लावावा लागला.

2014च्या विधानसभा निवडणुकांमध्ये बेलापूर मतदार संघातून मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईकांचा पराभव केला होता. त्यावेळी त्या नवी मुंबईत किंग ठरल्या होत्या. खासदारकी, आमदारकी, महापौर आणि अशी अनेक पद घेऊन नवी मुंबईत उभ्या असलेल्या गणेश नाईक यांना 2014च्या लोकसभेत धक्का बसला.

गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक यांचा पराभव करत ठाण्यात राजन विचारे यांनी शिवसेनेचा झेंडा फडकावला. त्यानंतर झालेल्या विधानसभेत मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांचा पराभव केला. या दोन धक्कामुळे नवी मुंबईतील गणेश नाईकांच्या सत्तेला सुरुंग लागला अशा चर्चा होत्या. या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये दाखल झालेल्या गणेश नाईक यांचं पक्षांतर किती यशस्वी होतं, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल.

VIDEO : 'निलेशने विचारलं शिवसेनेनं दिलेला त्रास विसरलात का?' नितेश राणे म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 14, 2019 03:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading