भाजप उमेदवार सुनील देशमुख यांचे पोस्टर्स फाडले, अमरावतीत तणाव

भाजप उमेदवार सुनील देशमुख यांचे पोस्टर्स फाडले, अमरावतीत तणाव

डॉ. देशमुख यांचे प्रचार बॅनर फाडून टाकल्याने या परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

  • Share this:

सुनील शेंडे, अमरावती, 12 ऑक्टोबर : अमरावतीत भाजपचे उमेदवार सुनील देशमुख यांचे पोस्टर फाडण्यात आले. काही युवकांनी डॉ. देशमुख यांचे प्रचार बॅनर फाडून टाकल्याने या परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

भाजप उमेदवार सुनील देशमुख यांना काँग्रेसच्या सुलभाताई खोडके यांचं तगडं आव्हान या निवडणुकीमध्ये आहे. मागील 5 वर्षात कुठलीही विकास कामं या परिसरात झाली नसल्याचा आरोप करत युवकांनी सुनील देशमुख यांनी हे पोस्टर्स फाडले. विशेष म्हणजे अमरावती महानगरपालिकेचे भाजपचे महापौर यांचा हा प्रभाग असून महापौर हे डॉ. सुनील देशमुख यांच्या गटाचेच आहेत.

अमरावती विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सध्या जोर आला असून सर्वच उमेदवार प्रचारात मग्न आहेत. आज अमरावती शहरात भाजपचे उमेदवार डॉ सुनील देशमुख यांच्या कार्यकर्त्यांची पदयात्रा विलास नगर भागात पोहचली असता या परिसरातील नागरिकांनी सुनील देशमुख यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे परिसरात काही वेळासाठी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

SPECIAL REPORT: तळकोकणातील राजकीय शिमग्यात मुख्यमंत्र्यांची उडी?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 12, 2019 03:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading