केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हेलिकॉप्टरचं नाशिकमध्ये इमर्जन्सी लँडिंग

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हेलिकॉप्टरचं नाशिकमध्ये इमर्जन्सी लँडिंग

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हेलिकॉप्टरचं नाशिकमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.

  • Share this:

नाशिक, 19 ऑक्टोबर: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हेलिकॉप्टरचं नाशिकमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. अमित शहा यांची शनिवारी (19 ऑक्टोबर) अकोले येथे जाहीर सभा होती. यासाठीच ते हेलिकॉप्टरनं सभास्थळी निघाले होते. पण खराब हवामानामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरचं ओझर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. ढगाळ हवामान आणि पावसामुळे अखेर अमित शहांची सभा रद्द करण्यात आली. सभास्थळी वेळेवर पोहोचणं शक्य न झाल्यानं सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर होते.

(वाचा : Alert मतदानाच्या दिवशी राज्यात कोसळधारा; या जिल्ह्यांत होणार वादळी पाऊस)

भारतीय हवामान विभागाने (IMD)दिलेल्या अंदाजानुसार मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पुणे, कोकण आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात सोमवारी वादळी पाऊस होऊ शकतो.

शुक्रवारपासून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातलं वातावरण बदललं आहे. मान्सून परतल्याची बातमी आल्यानंतर दुसऱ्याच दिवशीपासून या बेमोसमी पावसाला सुरुवात झाली असून सोमवारी (21 ऑक्टोबरला)मतदानाच्या दिवशीही पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवल्यामुळे याचा मतदानावर परिणाम होणार की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

(वाचा : शरद पवारांच्या टीकेवर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया, जाहीर सभेत म्हणाले...)

मुंबई उपनरांसह, ठाणे, पुणे, सातारा जिल्ह्यांमध्ये शनिवारी सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू झाली आहे. काही ठिकाणी पावसाचा जोर अधिक आहे. असाच पाऊस सोमवारीही होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या पश्चिम प्रभागाचे सहसंचालक के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात लक्षद्वीपजवळ वाऱ्यांची चक्राकार स्थिती निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. मोसमी पाऊस परतल्यानंतरही पावसाळा सुरू असण्यामागे हे कारण आहे. मंगळवारपर्यंत ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

(वाचा : PMC बँकेसारखा धोका टाळायचा असेल तर पैसे गुंतवण्यासाठी हे आहेत सुरक्षित पर्याय)

कुठे आहे Alert?

पुणे, नगर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये शनिवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने नोंदवली आहे. या जिल्ह्यांत काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊसही होऊ शकतो. त्यासाठी इथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये सोमवारी - मतदानाच्या दिवशीची पावसाचा अंदाज आहे.

VIDEO : गर्दीने गजबजलेल्या ठाण्यात माणुसकीचं दर्शन, एका मुक्या जीवाची सुटका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 19, 2019 05:34 PM IST

ताज्या बातम्या