मुख्यमंत्र्यांनी घात केला, भाजपचा इच्छुक बंडखोरी करणार

मुख्यमंत्र्यांनी घात केला, भाजपचा इच्छुक बंडखोरी करणार

'ज्यांना देव मानलं त्याच मुख्यमंत्र्यांनी घात केला.'

  • Share this:

नितीन बनसोडे, लातूर, 2 ऑक्टोबर : भाजपची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर डावललेल्या इच्छुकांनी पक्षाविरोधात भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. अहमदपूरमध्ये भाजपचे बंडखोर नेते दिलीपराव देशमुख यांनी मोठी रॅली काढत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. तसंच अपक्ष म्हणून उमेदवारी अर्जही दाखल केला.

'ज्यांना देव मानलं त्याच मुख्यमंत्र्यांनी घात केला,' असं म्हणत दिलीपराव देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. दिलीप देशमुख हे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. पण गेल्या तीन टर्मपासून विधानसभा लढवण्यास इच्छुक असलेल्या देशमुखांना भाजपने यंदाही डावललं.

तिकीट न मिळाल्याने दिलीप देशमुख यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत पक्षाविरोधात बंड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आता भाजप उमेदवारासमोरच नवं आव्हान उभं राहिलं आहे.

दरम्यान, याआधीच भाजपच्या अयोध्या केंद्रे यांनी वंचित आघाडीत प्रवेश करून तिकीट मिळवलं आहे. त्यानंतर आता दिलीपराव देशमुखांनी बंडखोरी करत रणशिंग फुंकल्यानं भाजपची वाटचाल खडतर झाल्याची चर्चा आहे.

भाजपच्या महिला आमदारानी नाकारली राज ठाकरे-अजित पवारांची ऑफर, दिलं हे उत्तर

Published by: Akshay Shitole
First published: October 2, 2019, 11:37 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading