राष्ट्रवादीचे 'हे' 4 विद्यमान आमदार सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात?

राष्ट्रवादीचे 'हे' 4 विद्यमान आमदार सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात?

लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेनं विरोधी पक्षातील नेते आपल्याकडे खेचत मोठा विजय मिळवला.

  • Share this:

मुंबई, 17 जुलै : विधानसभेच्या प्रत्यक्ष रणसंग्रामाला सुरुवात होण्याआधीच सत्ताधारी भाजप आणि शिवसेना हे राष्ट्रवादीला धक्का देण्याच्या तयारीत आहे. कारण राष्ट्रवादीचे 4 विद्यमान आमदार युतीच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेनं विरोधी पक्षातील नेते आपल्याकडे खेचत मोठा विजय मिळवला. हीच रणनीती आता विधानसभा निवडणुकीतही वापरण्याचा प्रयत्न या दोन्ही पक्षांकडून केला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे चार आमदार शिवसेना आणि भाजपच्या संपर्कात आहेत. याबाबत 'हिंदुस्तान टाईम्स' या इंग्रजी दैनिकाने वृत्त दिलं आहे.

कोण-कोणते आमदार युतीच्या संपर्कात?

1. नगरमधील आमदार संग्राम जगताप

2. वैजापूरचे आमदार भाऊसाहेब चिकटगांवकर

3. श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे

4. उल्हासनगरच्या आमदार ज्योती कलानी

संग्राम जगतापांनी चर्चा फेटाळल्या

संग्राम जगताप हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली असताना स्वत: जगताप यांनी मात्र या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. मी राष्ट्रवादीसोबत असून माझा शिवसेना प्रवेश या फक्त अफवा आहेत, असा दावा आमदार संग्राम जगताप यांनी केला आहे.

भरधाव कारच्या धडकेत 2 सख्ख्या भावांचा मृत्यू; अपघाताचा थरार CCTVमध्ये कैद

First published: July 17, 2019, 3:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading