तीन पिढ्यांना सोबत घेत 102 वर्षांच्या आजीबाईंनी केलं मतदान

लोकसभेसह आजवरच्या तब्बल 14 पेक्षा जास्त विधानसभा निवडणुकीत आजीबाईंनी मतदानाचा हक्क बजावलाय.

News18 Lokmat | Updated On: Oct 21, 2019 02:55 PM IST

तीन पिढ्यांना सोबत घेत 102 वर्षांच्या आजीबाईंनी केलं मतदान

लक्ष्मण घाटोळ, नाशिक 21 ऑक्टोंबर : मतदानाच्या दिवशी अनेक जण आपला हक्क न बजावता पर्यटनासाठी बाहेर निघून जातात. मात्र नाशिकच्या गवळाने गावात राहणाऱ्या 102 वर्षांच्या सखुबाई नामदेव चुंबळे मात्र स्वतंत्र भारताच्या प्रत्येक निवडणुकीत आपल्या संपूर्ण परिवाराला घेऊन जात मतदानाचा हक्क बजावत आल्या आहे. जिल्हा परिषद, ग्राम पंचायत, लोकसभेसह आजवरच्या तब्बल 14 विधानसभा निवडणुकीत आजीबाईंनी मतदानाचा हक्क बजावलाय. आपल्या तीन पिढ्याना बरोबर नेत आजीबाईंनी मतदान केलं. तरुणांसमोर एक आदर्श निर्माण करणाऱ्या 102 वर्षांच्या सखुबाई चुंबळे या मतदानासाठी उत्साहाने आल्यात.

अनेक पावसाळे आणि उन्हाळे पाहिलेल्या आणि रापलेल्या त्यांच्या चेहेऱ्यावरचा अनुभवच सगळं काही सांगून जातो. पूर्वीचा प्रचार आणि आताचा प्रचार यात मोठं अंतर आहे. पूर्वी नेते हे लोकांशी थेट संपर्कात असायचे आता पाच वर्षानंतरच त्यांची भेट होते असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

मनोहर जोशींनी दिला शिवसेना-भाजपला घरचा अहेर, म्हणाले...

अनोखं स्वागत

जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं यासाठी आयोगाने अनेक उपक्रम राबवले आहेत. मुंबईतल्या भायखळा इथलं मतदान केंद्र रांगोळ्या आणि फुग्यांनी सजविण्यात आलंय. मतदान केंद्रबाहेर अतीशय सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत. तर मतदान केंद्राच्या प्रवेश व्दारावर फुग्यांची सजावट करण्यात आलीय. तर विदर्भातल्या यवतमाळमध्ये मतदारांचं औक्षण करण्यात आलंय. महिला मतदारासाठी  सखी मतदान केंद्र आहे त्याला ही  सजवण्यात आल आहे. त्यामुळे हे मतदान केंद्र मतदारांचं आकर्षण ठरलं आहे. राज्यातल्या अनेक शहरांमध्येही अशाच प्रकारे मतदानकेंद्र सजविण्यात आले आहेत.

Loading...

मला ओव्हर कॉन्फिडन्स नाही, तर कॉन्फिडन्स - उदयनराजे भोसले

यवतमाळ शहरातील नगर परिषदच्या संजय गांधी शाळेच्या मतदान केंद्रावर प्रशासनाच्यवतीने तहसीलदार रुपाली बेहरे यांनी मतदारांचे जोरदार स्वागत केलं. एवढच नव्हे तर त्यांचं औक्षण करून आणि गुलाब पुष्प  देऊन त्यांचं स्वागत केलं तसच त्यांना कापडी पिशवी ही देण्यात आली.  या ठिकाणी  एक सेल्फी पॉइंट सुद्धा तयार केला आहे त्याला पंख आहे आणि या माध्यमातून मतदार येऊन त्यांचा मतदानाची टक्केवारी वाढावी असा त्यामागचा दुहेरी उद्देश आहे. महिला मतदारासाठी  सखी मतदान केंद्र आहे त्याला ही  सजवण्यात आल आहे. त्यामुळे हे मतदान केंद्र मतदारांचं आकर्षण ठरलं आहे.

मनसोक्त मिसळ खा

मतदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी घराबाहेर पडावं यासाठी सरकार आणि निवडणूक आयोग कायम प्रयत्न करत असतात. तरीही मतदानाचं प्रमाण हे फार जास्त होत नाही. सरकारच्या जनजागृती मोहिमेत आता जनताही सहभागी होतेय. व्यावसायिकांनी या अनोखी शक्कल शोधून काढलीय. कुणी कडक मिसळ मोफत देतोय, कुणी एकावर एक फ्री तर कुणी दाढी- कटिंगही मोफत करून देतोय. मतदान केल्याचं दाखवा आणि कडक मिसळीवर मनसोक्त ताव मारा असं आव्हान या मंडळींनी मतदारांना केलंय. यात सर्वात आघाडीवर आहे ते पुणे. पुण्यातल्या जशा अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत तशीच प्रसिद्ध आहे ती मिसळ. मिसळीचे अनेक प्रकार पुण्यात बघायला मिळतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2019 02:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...