रात्रीत फिरणार का चाकं? भाजपकडे पुरेसं संख्याबळ जमलं नाही तर..

भाजप उद्या राज्यपालांशी चर्चा करणार आहे. पुरेसं संख्याबळ असल्याशिवाय ते सत्तास्थापनेचा दावा करणार नाहीत. पण 145 चा आकडा जमवणार कुठून? नाही जमला तर राज्याची राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने वाटचाल होणार का?

News18 Lokmat | Updated On: Nov 6, 2019 08:32 PM IST

रात्रीत फिरणार का चाकं? भाजपकडे पुरेसं संख्याबळ जमलं नाही तर..

मुंबई, 6 नोव्हेंबर : भाजपच्या नेत्यांनी आपण उद्या म्हणजे गुरुवारी राज्यपालांची भेट घेणार असल्याचं सांगितलं आहे. आम्ही युतीचं सरकार स्थापन करणार असा विश्वास भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला असला, तरी ते कसं शक्य आहे, हे त्यांनी सांगितलेलं नाही. भाजपच्या राज्यपाल भेटीच्या बातमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केवळ शुभेच्छा दिल्या आहेत. याचा अर्थ सेनेचं संख्याबळ त्यांच्या पाठीशी नाही. युतीच्या भिजत घोंगड्यावर अद्याप तोडगा निघालेला नसताना भाजप उद्या सत्तास्थापनेचा दावा करणार का आणि त्यांनी केला तर 145 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र त्यांना मिळणार का? पुरेसं संख्याबळ नसेल तर भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार नाही. त्यामुळे महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे जाणार का हे आज रात्रीतल्या घडामोडींवरून स्पष्ट होईल.

दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक मातोश्री या निवासस्थानी बोलावली आहे. सेनेची भूमिकाही उद्या स्पष्ट होईल. त्या अगोदर भाजप आणि सेनेत काही बोलाचाली होतात का यावर उद्याचं भवितव्य अवलंबून असेल.

वाचा -  गडकरी घेणार सरसंघचालकांची भेट, सत्तास्थापनेचा पेच सोडविण्यासाठी संघ 'दक्ष'

विधानसभा निवडणुका झाल्यानंतर राज्यात सत्ता संघर्ष सुरू झाला आहे. सत्तेसाठीच्या या वादामध्ये नागरिकांमध्ये मात्र संभ्रम वाढत आहे. त्यामुळे आता सत्ता कोण स्थापन करणार आणि कोणाचा मुख्यमंत्री असणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. एकीकडे राज्यात भाजप शिवसेना महायुतीचच सरकार येणार आहे असा विश्वास भाजपकडून व्यक्त करण्यात आला असून सेनेनं कोणताही प्रस्ताव पाठवलेला नसल्याचं भाजपचं म्हणणं आहे. तर लोकसभेत ठरल्याप्रमाणेच होईल असं सेनेकडून ठाम सांगण्यात आलं आहे. त्यामुळे विधानसभेत कोणाची सत्ता स्थापन होणार यावर आता जोरदार चर्चा सुरू आहे.

संंबंधित - निकालानंतरची सगळ्यात मोठी बातमी, भाजप करणार उद्या सत्ता स्थापनेचा दावा!

Loading...

सत्ता स्थापन करण्यासाठी पक्षाने बहुमत सिद्ध करणं महत्त्वाचं आहे. यावर शिवसेना आणि भाजपकडूनही आम्ही बहुमत सिद्ध करू असा दावा करण्यात आला आहे. तर शिवसेनेकडून अद्याप कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. भाजपची दारं 24 तास उघडी आहेत. आमच्या मनात कुठलीही शंका नाही असंही पाटील म्हणाले. भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. संसदीय मंडळानेही त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलं असंही त्यांनी स्पष्ट केलं. या सगळ्यावर आता शिवसेना काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

काय असतील 6 पर्याय?

1)सगळ्यात पहिला पर्याय म्हणजे सगळ्यात मोठा पक्ष आणि दुसरा मोठा पक्ष म्हणजे भाजप आणि शिवसेना युतीमध्ये सरकार स्थापन करेल.

2)दुसरा पर्याय म्हणजे सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजपने सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर 15 दिवसांत बहुमत सिद्ध करावं.

3)तिसरा पर्याय असा की बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपने इतर पक्षातील आमदारांचा पाठिंबा मिळवावा. भाजपने जर सेनेचे आमदार फोडले तर ते सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमत सिद्ध करू शकतात.

4)फडणवीस सरकार जर बहुमताचा आकडा सिद्ध करण्यासाठी अपयशी ठरलं तर दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेना सत्ता स्थापन करू शकते. पण त्यासाठी त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवण्याची गरज आहे.

5)शिवसेनेलाही जर बहुमत गाठता आलं नाही तर तिसरा मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादीने बहुमत सिद्ध करणं महत्त्वाचं आहे. यासाठी राष्ट्रवादीला काँग्रेसचा पाठिंबा आणि शिवसेनेचा बाहेरून पाठिंबा महत्त्वाचा आहे.

6)अखेर जर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीलाही बहुमत सिद्ध करण्यात आलं नाही तर सगळ्यात शेवटचा पर्याय म्हणजे राज्यात राष्ट्रपती लागवट लागू होण्याची शक्यता आहे.

--------------------

अन्य बातम्या

'शिवसेना युतीतून बाहेर पडत नाही, तोपर्यंत यावर तोडगा नाही'

वाचा - 'शिवसेनेचा मुख्यमंत्री बसल्याशिवाय उद्धव ठाकरे स्वस्थ बसणार नाहीत'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 6, 2019 08:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...