'मी यशश्री बंगला ते मोदींच्या सभेपर्यंत पोहोचले, बाकीचे बारामतीतच आहेत' पंकजा मुंडे पुन्हा आक्रमक

'मी यशश्री बंगला ते मोदींच्या सभेपर्यंत पोहोचले, बाकीचे बारामतीतच आहेत' पंकजा मुंडे पुन्हा आक्रमक

मागील पाच वर्षांत खूप काही घडलं. आरोप - प्रत्यारोप, गोपीनाथ गड, भगवान भक्तीगडाची उभारणी झाली, सत्तेच्या माध्यमातून कामं झाली.

  • Share this:

बीड, 19 ऑक्टोबर : 'स्वतःची आमदारकी आणखी साडे तीन-चार वर्ष सुरक्षित असताना मला संपवण्याचा अट्टाहास कशासाठी?' असा सवाल  पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना केला आहे. विरोधक विकासाच्या मोठ-मोठ्या गप्पा मारात आहेत, पण त्यांचं सरकार सत्तेवर येणारच नाही मग ते विकास करणारच कसा असेही त्या म्हणल्या. खरंतर आज विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी शेवटचा दिवस आहे. पण तरीदेखील मुंडे भाऊ-बहिणींमध्ये आरोप-प्रत्यारोप काही केल्या संपत नाही आहेत.

परळी तालुक्यातील नंदागौळ येथे सभेत त्या बोलत होत्या. पुढे बोलतांना म्हणाल्या की, मागील पाच वर्षांत खूप काही घडलं. आरोप - प्रत्यारोप, गोपीनाथ गड, भगवान भक्तीगडाची उभारणी झाली, सत्तेच्या माध्यमातून कामं झाली. हे करत असताना संघर्षही आला. माझा प्रवास यशश्री बंगला ते मोदींच्या सभेपर्यंत झाला. त्यांचा प्रवास मात्र बारामतीपर्यंत झाला. मोदींच्या सभेवरून त्यांनी वाटेल तशी टीका केली परंतु मोदींनी वैद्यनाथाचं दर्शन घेतलं आणि विरोधक तोंडघशी पडले' अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे.

इतर बातम्या - पैसे चोरल्याचा आरोप सहन न झाला नाही, 12 वर्षाच्या मुलाने उचललं धक्कादायक पाऊल  

मोदी मुंडे साहेबांच्या स्मारकाकडे गेले नाहीत म्हणून टीका करणारांनी जिवंतपणी मुंडे साहेबांकडे पाठ फिरवली. हे अजून लोक विसरले नाहीत. गोपीनाथ मुंडे हे नाव मतदारसंघाच्या कपाळावर लिहिलेले आहे. ते सहजासहजी पुसलं जाऊ शकत नाही. गोपीनाथ मुंडे हे नांव पुसण्यासाठी ते खूप प्रयत्न करत आहेत असंही त्या म्हणाल्या.

इतर बातम्या - BREAKING : अज्ञात वस्तूच्या स्फोटामुळे कोल्हापुरात खळबळ, एकाचा मृत्यू

माझ्या पाठीशी मोदी आहेत. मला आपल्या भागाचा विकास करायचा आहे. इथे उद्योग आणायचे आहेत. लोकांच्या हाताला काम द्यायचे आहे. महिलांना सक्षम करायचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हे बुडते जहाज आहे. त्यात बसण्याचा प्रयत्न करू नका, त्यांचे सरकार येणारच नाही मग ते विकास करणार कसा? असा सवाल त्यांनी केला. मला भरभरून आशिर्वाद द्यावेत असं आवाहन करायलाही त्या यावेळी विसरल्या नाहीत.

इतर बातम्या - आज प्रचाराचा शेवटचा दिवस गाजणार, मुख्यमंत्री ते राज ठाकरे अशा आहेत सभा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 19, 2019 11:35 AM IST

ताज्या बातम्या