भाजप शिवसेनेसह विरोधकांना देणार का आणखी एक दणका?

भाजप शिवसेनेसह विरोधकांना देणार का आणखी एक दणका?

शिवसेना आणि भाजपची जास्तीत जास्त आमदार आपल्या बाजूने वळवण्यासाठी स्पर्धा सुरू असतानाच भाजपच्या गोटातून एक जोरदार दणका देणारी बातमी आली आहे.

  • Share this:

मुंबई, 31 ऑक्टोबर : शिवसेना आणि भाजपची जास्तीत जास्त आमदार आपल्या बाजूने वळवण्यासाठी स्पर्धा सुरू असतानाच भाजपच्या गोटातून एक जोरदार दणका देणारी बातमी आली आहे. भाजपचे 105 आमदार निवडून आले आहेत. त्यानंतर काही अपक्ष आमदारांनी आणि छोट्या गटांनी भाजपला पाठिंबा जाहीर केल्याने भाजपचं एकट्याचं संख्याबळ 115 पर्यंत पोहोचलं होतं. त्यामध्ये आता आणखी भर पडण्याची शक्यता आहे. हितेंद्र ठाकुरांच्या बहुजन विकास आघाडीने भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याची बातमी एका वृत्तवाहिनीने दिली.

एबीपी माझाला दिलेल्या माहितीनुसार, बविआच्या 3 आमदारांनी भाजपला आपलं समर्थन जाहीर केलं आहे. तसं झालं तर भाजपचं संख्याबळ 117 पर्यंत पोहोचेल. बहुजन विकास आघाडीकडून अजूनपर्यंत अशी कुठलीही अधिकृत माहिती आलेली नाही.

वाचा - सत्तावाटपाचा वाद असतानाच शिवसेनेने घेतली राज्यपालांची भेट

बविआच्या तीन आमदारांपैकी कुणाशी संपर्क होऊ शकला नाही. नवनिर्वाचित आमदाक क्षितीज ठाकुरांनी TV9 शी बोलताना अजून आम्ही निर्णय घेतला नसल्याची माहिती दिली. ठाकूर कुटुंबीयातील आमदार मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर भेटीसाठी पोहोचल्यानंतर या पक्षाचा भाजपला पाठिंबा असल्याची चर्चा सुरू झाली होती. पण अद्याप तशी ठोस भूमिका या आघाडीने घेतलेली नाही.

वाचा - राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप, हेरगिरीसाठी मोदी सरकार घेतेय इस्रायलची मदत!

गेली अनेक वर्षं हितेंद्र ठाकूर स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. वसई, विरार, नालासोपारा इथे त्यांचं प्रभुत्व आहे. हितेंद्र ठाकुरांचा मुलगा क्षितीज ठाकूर या वेळी निवडणुकीच्या रिंगणात होते. ते दोघेही जिंकले. शिवाय बोईसरची जागाही बहुजन विकास आघाडीला मिळाली.

--------------------------------------

अन्य बातम्या

पुणेकरांसाठी पुढील 3 दिवस महत्त्वाचे.. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

प्रीती झिंटाची 'दबंग 3' मध्ये एंट्री? सोशल मीडियावर PHOTO VIRAL

PMC बँक घोटाळ्यातला सहावा बळी, महिलेचा हृदयविकाराने मृत्यू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 31, 2019 07:54 PM IST

ताज्या बातम्या