ओपिनियन पोलमध्ये मनसेला भोपळा, युती-आघाडीच्या गणितात 'वंचित'चं काय?

सी व्होटर आणि एबीपी माझाने केलेल्या सर्व्हेनुसार युतीला 205 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मनसेला मात्र एकही जागा नाही.

News18 Lokmat | Updated On: Sep 21, 2019 06:59 PM IST

ओपिनियन पोलमध्ये मनसेला भोपळा, युती-आघाडीच्या गणितात 'वंचित'चं काय?

मुंबई, 21 सप्टेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगानं विधानसभा निव़डणुक मतदान आणि निकालाच्या तारखांची घोषणा केली आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर आता निवडणूकपूर्व सर्वे समोर आले आहेत. महाराष्ट्राची सत्ता कुणाकडे याची चर्चा आता रंगली आहे. आघाडीला चितपट करत सत्ता राखण्याचं महायुतीसमोर आव्हान असणार आहे, तर युतीला धक्का देत राजकीय कमबॅक करण्याचा आघाडीचा प्रयत्न असणार आहे.

दरम्यान, सी व्होटर आणि एबीपी माझानं केलेल्या सर्वेमध्ये विधानसभेला युतीने निवडणूक लढल्यास महायुतीला 205 जागा मिळतील आणि सहज सत्ता काबीज करतील असं दिसतं. तर महाआघाडीला 55 आणि इतर 28 जागा मिळतील असं चित्र या सर्व्हेत दिसत आहे. दुसरीकडं टीव्ही

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे अनेक ठिकाणी निकालावर परिणाम झाले. याचा सर्वाधिक फटका महाआघाडीला बसला होता. आता विधानसभा निवडणुकीतही वंचितचा परिणाम निकालावर होऊ शकतो. युती किंवा आघाडीचं गणित बिघडलं तर इतर पक्षांना 64 जागा मिळतील असं या सर्व्हेतून समोर आलं आहे. त्यामुळं यात वंचितचा वाटा किती याचीच उत्सुकता असेल.

सी व्होटर आणि एबीपी माझाच्या सर्व्हेनुसार युती झाली नाही तर भाजपला 144 तर शिवसेनेला 39 जागा मिळतील. 2014 च्या जागांच्या तुलनेत यावेळी तब्बल 24 जागांचा फटका बसू शकतो असं या सर्व्हेत दिसत आहे. आघाडीतही बिघाडी झाल्यास काँग्रेसला 21 तर राष्ट्रवादीला 20 जागा मिळतील असा अंदाज सर्व्हेत वर्तवला आहे.

इतर बातम्या - दारूच्या नशेत वॉर्ड बॉय आरोग्य मंत्र्यांच्या पडला पाया, आशीर्वाद म्हणून मिळालं..

Loading...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विधानसभा निवडणुकीत शून्य जागा मिळतील असा अंदाज सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 2009 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवताना मनसेनं 13 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर 2014 मध्ये केवळ 2 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. आता एकही जागा जिंकणार नाही असा अंदाज पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. खरंतर मनसेने निवडणुका जाहीर होण्याच्या एक दिवस आधीच निवडणुक लढवणाऱ असल्याचं जाहीर केलं आहे. त्यापूर्वीच हा सर्व्हे करण्यात आला होता.

VIDEO : सातारा पोटनिवडणूक होणार नाही, उदयनराजेंबद्दल भाजपची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2019 06:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...