Home /News /maharashtra /

Coronavirus : 22 राज्यांसह 80 जिल्हे बंद, संपूर्ण महाराष्ट्रातही लॉकडाऊन

Coronavirus : 22 राज्यांसह 80 जिल्हे बंद, संपूर्ण महाराष्ट्रातही लॉकडाऊन

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता मुंबईसह महाराष्ट्र आणि देशभरातील 13 राज्यांमध्ये लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    मुंबई, 23 मार्च : ोपोदेशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आतापर्यंत 396 पर्यंत पोहोचल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. लॉकडाऊनदरम्यान अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात आला होता. त्यानंतर कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यानं कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव टाऴण्यासाठी सरकारनं लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णालये, पेट्रोलपंप, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी काही ठराविक दुकानं सुरु राहणार आहेत. लोकलसह रेल्वे आणि बस सेवाही 31 मार्चपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. कोरोनाची महाराष्ट्रातील वाढती संख्या चिंतेची बाब असल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. 31 मार्चपर्यंत संपूर्ण राज्याात बंद पाळण्याचं आवाहन प्रशासनाकडून जनतेला करण्यात आलं आहे. हे वाचा-इटलीत आज एकाच दिवशी 651 जणांचा मृत्यू, एकूण संख्या 5,500वर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्व प्रवासी गाड्या, आंतरराज्यीय बस सेवा आणि मेट्रो सेवा 31 मार्चपर्यंत बंद केली आहे. त्याच वेळी, केंद्राने घोषित केलेल्या भारतातील 80 जिल्ह्यांमधील लॉकडाऊन व्यतिरिक्त, 13 राज्यातील सरकारनं त्यांच्या राज्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. या राज्यांमध्ये महाराष्ट्र, केरळ , हरियाणा , उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पंजाब यांचा समावेश आहे. दिल्ली, नागालँड, झारखंड आणि राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल (पश्चिम बंगाल) मध्ये 27 मार्चपर्यंत लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. आतापर्यंत भारतात कोरोनामुळे 7 जणांचा मृत्यू झाला असून 396 जणांना लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 74 रुग्ण आहेत. शनिवारी 10 नवीन मुंबई आणि पुण्यात असे रुग्ण आढळल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. हे वाचा-MPSCच्या पूर्व परीक्षेचं वेळापत्रक बदललं, ही आहे नवी तारीख लॉकडाऊन म्हणजे नेमकं काय? लॉकडाऊन ही आपत्कालीन प्रणाली आहे, जी एखाद्या साथीच्या किंवा आपत्तीच्या वेळी अधिकृतपणे शहरात लागू केली जातात. कोरोनामुळे सध्या चीन, इटली, स्पेन या देशांमध्येही लॉक डाऊन करण्यात आला आहे. चीनमधील परिस्थिती लॉक डाऊननंतरच सुधारली त्यामुळे राज्यात कोरोनाचे संक्रमण कमी करण्यासाठी नागरिकांना घरात राहणे बंधनकारक आहे. लॉक डाऊनमध्ये लोकांना घरे सोडण्याची परवानगी नसणार. तसेच, 5 पेक्षा जास्त लोकं एका ठिकाणी जमू शकणार नाही. लोकांना केवळ औषध, अन्नधान्य अशा आवश्यक गोष्टींसाठी बाहेर येण्याची परवानगी असणार आहे. का केलं जात लॉक डाऊन लॉकडाऊन ही आपत्कालीन परिस्थितीमध्ये लागू केली जाते. समाजात किंवा शहरात राहणाऱ्या स्थानिक लोकांना आरोग्यापासून किंवा इतर जोखमीपासून संरक्षित करण्यासाठी लॉकडाऊन केले जाते. कोरोनाचा प्रसार सध्या भारतात वेगाने होत आहेत. यात महाराष्ट्र सर्वात आघाडीवर आहे. याआधी राजस्थानमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्याच धर्तीवर महाराष्ट्राने हा निर्णय घेतला आहे. हे वाचा-कोरोना तपासण्यांची क्षमता लवकरच 100 हून 2200 पर्यंत; अमित देशमुखांची माहिती
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms, Uddhav thacakrey

    पुढील बातम्या