मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'हिंसाचाराला चिथावणी देणार्‍या अफवा पसरू नयेत', अमरावतीत हिंसाचारानंतर इंटरनेट सेवा तीन दिवस बंद

'हिंसाचाराला चिथावणी देणार्‍या अफवा पसरू नयेत', अमरावतीत हिंसाचारानंतर इंटरनेट सेवा तीन दिवस बंद

अमरावती बंदची (Amravati bandh) हाक देण्यात आली होती. अमरावती शहर बंदला हिंसक वळण (violence during Amravati bandh) लागलं.

अमरावतीत, 14 नोव्हेंबर: त्रिपुरात (Tripura) घडलेल्या अत्याचाराच्या प्रकारानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. शुक्रवारी राज्यातील विविध भागांत निषेध मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर शनिवारी अमरावती बंदची (Amravati bandh) हाक देण्यात आली होती. अमरावती शहर बंदला हिंसक वळण (violence during Amravati bandh) लागलं. त्यानंतरअमरावतीत बंद दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या घटनानंतर शनिवारपासून संचारबंदी लागू करण्यात आली. त्यानंतर पुढचे तीन दिवस इंटरनेट सेवा निलंबित करण्यात आली आहे. शहर पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.

तीन दिवस इंटरनेट सेवा निलंबित

हिंसाचाराला चिथावणी देणार्‍या अफवा पसरू नयेत म्हणून इंटरनेट सेवा तीन दिवस बंद ठेवली जाईल, अशी माहिती शहर पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी सांगितलं.

हेही वाचा- Video: राज्यातल्या मंत्र्यानं केला CSMT ते उल्हासनगर लोकल प्रवास, आठवणींना दिला उजाळा

सध्या अमरावतीमध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे. शनिवारी जमावाकडून दुकानांवर दगडफेक (stone pelting) आणि तोडफोड करण्यात आली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. वैद्यकीय कारणाशिवाय कोणालाही घराबाहेर न पडण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आलेत.

त्रिपुरात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता, मात्र या मोर्चाला गालबोट लागलं होतं. या मोर्चाला हिंसक वळण आलं तर गाड्या आणि 20 ते 25 दुकानाची तोडफोड करण्यात आली होती. याचाच निषेध म्हणून शनिवारी अमरावती शहर बंदचे आवाहन भारतीय जनता पक्षाचे वतीने करण्यात आले होते.

शुक्रवारी मालेगावात हिंसाचार, 10 पोलिसांसह 2 नागरिक जखमी

त्रिपुरामध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ मालेगाव येथे शुक्रवारी बंद पुकारण्यात आला होता. पण, या बंदला हिंसक वळण मिळाले. जमावाने केलेल्या दगडफेकीमध्ये 3 पोलीस अधिकारी, 7 कर्मचारी आणि 2 नागरिक जखमी झाले. सध्या परिस्थिती आटोक्यात आली असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

हेही वाचा-  T20 World Cup Final: न्यूझीलंडच्या खेळाडूनं जिंकली मनं, तुटलेल्या हातानं घेतली सहकाऱ्याची प्रॅक्टीस! VIDEO

गेल्या काही दिवसांपासून त्रिपुरामध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शुक्रवारी राज्यभरात ठिकठिकाणी वेगवेगळ्या संघटनांकडून बंद पुकारण्यात आला होता. नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्येही बंद पुकारण्यात आला होता. या बंदला उत्स्फुर्तपणे प्रतिसाद मिळाला होता.

First published:
top videos

    Tags: Amravati