अमेरिकन लष्करी अळीचा आता उसावर हल्लाबोल; शेतकऱ्यांमध्ये खळबळ

अमेरिकन लष्करी अळीचा आता उसावर हल्लाबोल; शेतकऱ्यांमध्ये खळबळ

महाराष्ट्राचं सर्वांत महत्त्वाचं नगदी पीक असलेल्या ऊसावर या अमेरिकन फाल आर्मी वर्म (स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा) या अळीनं आपला मोर्चा वळवलाय.

  • Share this:

संदीप भुजबळ, मुंबई, 9 ऑक्टोबर : अमेरिकन फाल आर्मी वर्म (स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा) या नव्या किडीचा नुकताच महाराष्ट्रात मका पिकावर प्रादुर्भाव आढळलाय. त्यानं पुढील संकटाची चाहूल दिलीय. पण त्याहून धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्राचं सर्वांत महत्त्वाचं नगदी पीक असलेल्या ऊसावर या अळीनं आपला मोर्चा वळवलाय. उसाची पाने फस्त करण्यास सुरवात केली आहे. हुमणी किडीसह विविध समस्यानी आधीच त्रस्त असलेल्या ऊस उत्पादकांसाठी ही धोक्याची मोठी घंटाच मानली जात आहे.

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील घोगाव, बलवडी (भाळवणी) भागातील काही ऊस उत्पादकांच्या शेतात या अळीचा सुमारे पाच ते १० टक्क्यांपर्यंत प्रादुर्भाव झाल्याची नोंद कीटकशास्त्र विषयातील तज्ज्ञ आणि सिक्स ग्रेनचे संशोधक डॉ. अंकुश चोरमुले यांनी केली आहे. या किडीची ऊस पिकातील ही देशातील पहिलीच नोंद असावी, अशी शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यानं ऊस उत्पादकाच्या संकटात आणखी भर पडणार असल्याचं नक्की झालंय.

भारतात सर्वप्रथम कर्नाटक राज्यात या किडीचा प्रादुर्भाव दिसून आला होता. प्रामुख्याने मका या पिकावर आढळून येणाऱ्या या अळीचा प्रादुर्भाव आता सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातल्या ऊस पिकावर दिसून आलाय. या किडीचे शास्त्रीय नाव स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा असून पीक नष्ट करण्याची ताकद असल्यामुळं या किडीला फ्रुगीपर्डा हे नाव देण्यात आले आहे.

या किडीचे पतंग इकते ताकदवान आहेत की, एका रात्रीत सुमारे १००  किलोमीटरपर्यंतचा ते प्रवास करू शकतात. प्रजनन क्षमताही जास्त असल्यामुळे ताबडतोब उपाययोजना न केल्यास पीक फस्त होण्याची भीती असते.

 VIDEO - बिग बॉसमध्ये जसलीनने अनुप जलोटांभोवती केला पोल डान्स

First published: October 9, 2018, 9:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading