14 एप्रिल : गणित चुकंल म्हणून तोंडात छडी घालून विद्यार्थ्याला मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी येथे जिल्हा परिषद शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. तोंडात छडी घालून मारहाण केल्यामुळे विद्यार्थ्याने त्याचा आवाज गमावला आहे.
चंद्रकांत शिंदे या शिक्षकाने दुसरीतील रोहन झंजिरे या विद्यार्थ्याला मारहाण केली या मारहाणीत रोहन गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या रुबीमध्ये उपचार सुरु आहे. घश्यात गेलेल्या काठीमुळे त्याला अनेक इजा झाल्या आहे. त्यामुळे रोहनला बोलताना प्रचंड त्रास होत असल्याची माहितीही समोर आली आहे. कर्जत पोलीस स्टेशनला सुनिता दत्तात्रय झंजिरे यांनी गुन्हा दाखल केला आहे.
गणित चुकल्यामुळे लाकडी छडी तोंडात घालुन मारहाण केल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. १० एप्रिलला घटना घडली असुन कलम ३२४,५०६ अन्वये गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahamadnagar, Marhan, Student, Teacher, अहमदनगर, मारहाण, विद्यार्थी