Home /News /maharashtra /

महाराष्ट्राची वाटलाच कोरोनामुक्तीकडे; आज 71,966 रुग्णांची कोरोनावर मात

महाराष्ट्राची वाटलाच कोरोनामुक्तीकडे; आज 71,966 रुग्णांची कोरोनावर मात

महाराष्ट्रात आज 71,966 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र मृतकांचा आकडा हा मोठा आहे.

  मुंबई, 11 मे: महाराष्ट्राची (Maharashtra) वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने होत असल्याचं दिसत आहे. कारण, गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना (Corona) बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचं दिसत आहे. आज राज्यात 71,966 रुग्ण कोरोनामुक्त (71,966 discharged today) झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 45,41,391 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.67 टक्के इतके झाले आहे. आज राज्यात 40,956 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 5,58,996 इतकी झाली आहे. सध्या राज्यात 35,91,783 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 29,955 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज कुठल्या विभागात किती रुग्णांची नोंद? ठाणे - 5024 नाशिक - 6482 पुणे - 11191 कोल्हापूर - 3643 औरंगाबाद - 1930 लातूर - 2872 अकोला - 4376 नागपूर - 5438 एकूण - 40,956 कोविड सेंटरमधून 80 वर्षीय रुग्ण बेपत्ता; वसईतील घटनेने खळबळ सर्वाधिक सक्रिय रुग्ण हे पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण 95,731 सक्रिय रुग्ण आहेत. नागपूर जिल्ह्यात 53,020 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत 40,162 तर ठाणे जिल्ह्यात 31,446 सक्रिय रुग्ण आहेत. पाहा कुठल्या जिल्ह्यात किती सक्रिय रुग्ण
  अ.क्र.जिल्हाबाधित रुग्णबरे झालेले रुग्णमृत्यूइतर कारणामुळे झालेले मृत्यूॲक्टिव्ह रुग्ण
  मुंबई६७९१२९६२३२०५१३९०६१८५६४०१६२
  ठाणे५४०४९५५०१५५६७४६२३१३१४४६
  पालघर१०२८१६८५७६२१२६६१०१५७७८
  रायगड१३४३७११२२०६०२३४७९९६२
  रत्नागिरी३१४५०२०८९०६०१९९५७
  सिंधुदुर्ग१७६१८१२३७९४२४४८१२
  पुणे९३८४७४८३२५८३१०१०२५८९५७३१
  सातारा१२६६५११०११५५२४९७१२२२९८७
  सांगली९८१३९७५३५६२२८२२०४९९
  १०कोल्हापूर८२५८३६२२३१२०१११८३३८
  ११सोलापूर१३०३४०१०३५६७३०२७५९२३६८७
  १२नाशिक३५५३४७३२४७३१३८०९२६८०६
  १३अहमदनगर२०९६९४१८०७६३२३३९२६५९१
  १४जळगाव१२८४९०११३४७०२०८३३२१२९०५
  १५नंदूरबार३७२७५३३५३७६८७३०४९
  १६धुळे४०८२९३६७७८४९०१२३५४९
  १७औरंगाबाद१३५८०२१२३२००२१७८१४१०४१०
  १८जालना५१७२७४३८९४७७७७०५५
  १९बीड७०११७५२३०५११८८१६६१५
  २०लातूर८२३६१६८३२९१४०२१२६२६
  २१परभणी४४२८९३८०५७७२६११५४९५
  २२हिंगोली१५८१६१३७०५२२७१८८४
  २३नांदेड८६६५२७९४७७१८८९५२७८
  २४उस्मानाबाद४६७३३३९०३२११०३४५६५५३
  २५अमरावती७३३३३६१४३३१०९७१०८०१
  २६अकोला४६३८७४०६७९७२९४९७५
  २७वाशिम३२७३२२८१०६३९९४२२४
  २८बुलढाणा६२७६०५६२५४४१०६०९१
  २९यवतमाळ६१५५३५३९३२११३३६४८४
  ३०नागपूर४६९२०६४१०४२६५७१४४६५३०२०
  ३१वर्धा५११९२४३०८३६७३८३७३५३
  ३२भंडारा५६६६८५०४७४५६१५६२६
  ३३गोंदिया३७४५९३२२५२३९२४८०९
  ३४चंद्रपूर७६६८७५५७०७८९७२००८१
  ३५गडचिरोली२४६०८२१०२३२४५३३३१
  इतर राज्ये/ देश१४६११८२६
  एकूण५१७९९२९४५४१३९१७७१९१२३५१५५८९९६
  बाधितांचा आकडा मोठा राज्यात आज 793 कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी 403 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 170 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 220 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
  Published by:Sunil Desale
  First published:

  Tags: Coronavirus, Maharashtra, Mumbai

  पुढील बातम्या