Coronavirus बाबत महाराष्ट्रासाठी आणखी एक चांगली बातमी, 56 जणांचा रिपोर्ट निगेटीव्ह

Coronavirus बाबत महाराष्ट्रासाठी आणखी एक चांगली बातमी, 56 जणांचा रिपोर्ट निगेटीव्ह

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत 36 हजार 28 प्रवासी तपासण्यात आले आहेत.

  • Share this:

मुंबई, 16 फेब्रुवारी : मुंबई बंदरावर काल दाखल झालेल्या फिलिपाईन्सच्या एम व्ही बौडिका या जहाजावरील (क्रूझ) एका फिलिपाईन नागरिकाला ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने त्याला या जहाजावरच विलगीकरण करण्यात आले. त्याचा प्रयोगशाळा नमुना कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळा इथं पाठवण्यात आला आहे.

एम. व्ही. बौडिका या जहाजावर कुणीही भारतीय नसून कुणाला कसलीही लक्षणे नाहीत. हे जहाज आज पोरबंदरला पोहचले. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी 56 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना निगेटिव्ह आले आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत 36 हजार 28 प्रवासी तपासण्यात आले आहेत. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून 216 प्रवासी आले आहेत. राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत 60 जणांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी 50 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या प्रत्येकी 3 जण मुंबई, सांगली आणि पुण्यात भरती आहेत.

अस्थी विसर्जन केल्यानंतर कुटुंबावर काळाचा घाला; भीषण अपघातात 7 जण ठार, 14 जखमी

करोना विषाणू आजार प्रतिबंध आणि नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले असून राज्यात सध्या 39 विलगीकरण कक्षांमध्ये 361 बेड्स उपलब्ध आहेत. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण 216 प्रवाशांपैकी 137 प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 16, 2020 09:51 PM IST

ताज्या बातम्या