ठाण्यात सांडपाणी प्रक्रिया केंद्रात गुदमरून 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू

ठाण्यात सांडपाणी प्रक्रिया केंद्रात गुदमरून 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू

ठाण्यामध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्रात गुदमरून तीन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

  • Share this:

ठाणे, 10 मे : ठाण्यामध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील सेप्टीक टॅंकमध्ये आठ कामगार अडकल्याचे वृत्त समोर आले आहे. यातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर टँकमध्ये गुदमरल्यानं अन्य पाच जणांची प्रकृती खालावल्यानं त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.  ढोकाळी परिसरातील ही घटना आहे. गुरुवारी रात्री उशिरा 12.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

अमित पुहाल (वय 20 वर्ष), अमन बादल (वय 21 वर्ष) आणि अजय बुंबक (वय 24 वर्ष)अशी मृतांची नावं आहेत. या तिघांचेही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. दरम्यान, सांडपाणी प्रक्रिया केंद्रात अडकलेल्या अन्य पाच जणांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांना यश आले. यानंतर पाचही जणांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आता पाचही जणांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

वाचा अन्य बातम्या

SPECIAL REPORT : नाशिकमध्ये 2 महिन्यात 40 मोरांचा मृत्यू, वन खातं काय करतंय?

VIDEO : विखेंच्या भाजपप्रवेशाबाबत चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान

शिवसेना आणि नितीश कुमारही भाजपविरोधी आघाडीला साथ देतील'

नरेंद्र मोदींनी का केलं राजीव गांधींना टार्गेट? पाहा हा SPECIAL REPORT

First published: May 10, 2019, 6:31 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading