एका महिन्यात मागास आयोगाचा अहवाल येईल- देवेंद्र फडणवीस

एका महिन्यात मागास आयोगाचा अहवाल येईल- देवेंद्र फडणवीस

पोलिसांवरील हल्ले आणि जाळपोळींसारखे गुन्हे कुठल्याही परिस्थितीत मागे घेण्यात येणार नाहीत

  • Share this:

मुंबई, २९ जुलैः आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, नारायण राणे यांच्या उपस्थित मराठा आंदोलकांमध्ये बोलावलेली बैठक पार पडली. यानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, ज्या संघटना चर्चा करायला तयार झाल्या त्यांच्याशी आम्ही चर्चा केली असून, अजून कोणी संघटना चर्चेसाठी येणार असेल तर आमची त्यांच्याशी चर्चा करण्याची तयारी आहे. तसेच सरकारने मागास आयोगास लवकरात लवकर अहवाल देण्याची विनंती केली असून, अहवाल आला की एका महिन्यात अधिवेश केले जाईल. त्यामुळे सकल मराठा समाजाने राज्यात शांतता राखावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

मराठा आंदोलनादरम्यान, तरुणांवर दाखल करण्यात आलेले ३०७ सह सर्व प्रकारचे गुन्हे मागे घेण्यात येतील. मात्र, पोलिसांवरील हल्ले आणि जाळपोळींसारखे गुन्हे मागे घेतले जाणार नसल्याचे ते म्हणाले. जे व्हिडीओंमध्ये या सर्व गोष्टी करताना दिसत आहेत त्यांच्यावरील गु्न्हे कुठल्याही परिस्थितीत मागे घेण्यात येणार नाहीत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मराठा तरुणांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ तसेच मेगा भरती संदर्भात स्पष्ट भूमिका घेऊ असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. आंदोलनानंतर मुख्यमंत्री आणि आंदोलकांमध्ये ही पहिलीच चर्चा झाली. यावेळी आमदार नितेश राणेही बैठकीला उपस्थित होते.

हेही वाचा-

मराठा आरक्षणासाठी आमदारांचे राजीनामे खरे की स्टंटबाजी ? हे आहे सत्य

आजपासून 'या' वस्तू स्वस्त, खरेदी करताना किंमत नक्की पहा!

VIDEO : पप्पा नको ना, तरीही निर्दयी बाप मुलीला देत होता मेणबत्तीचे चटके

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 29, 2018 04:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading