'...तर मग फडणवीसांनी शिवसेनेत प्रवेश करावा'

'...तर मग फडणवीसांनी शिवसेनेत प्रवेश करावा'

'देवेंद्र फडणवीस हे युतीचे मुख्यमंत्री. ते सेनेचंही प्रतिनिधित्व करतात', असं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं. त्यावर अपक्ष आमदार बच्चू कडू यांची प्रतिक्रिया वाचा..

  • Share this:

मुंबई, 7 नोव्हेंबर : 'देवेंद्र फडणवीस हे युतीचे मुख्यमंत्री. ते सेनेचंही प्रतिनिधित्व करतात', असं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं. त्यावर 'त्यांना फडणवीस जर शिवसैनिकांचं प्रतिनिधित्व करतात असं त्यांचं म्हणणं असेल तर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा', अशी प्रतिक्रिया अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे. बच्चू कडू प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढले. त्यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेचा समर्थन दर्शवलं आहे.

सध्या निर्माण झालेल्या राजकीय तिढ्यामुळे राज्याचं नुकसान होत आहे, असं सांगत कडू यांनी अगोदर शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, अशी मागणी केली. "भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये 50-50 असा फॉर्म्युला ठरला असेल तर सेनेला अडीच वर्षं मुख्यमंत्रिपद द्यायला काय हरकत आहे. भाजप शब्द देऊन पाळत नसेल तर ती फसवणूक आहे", असं बच्चू कडू म्हणाले.

वाचा - ...तर ते भाजपचं पाप, युतीच्या सत्ता नाट्यावर धनंजय मुंडेंची आक्रमक प्रतिक्रिया

बच्चू कडू शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन मुंबईत आले होते. त्यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुखांची भेट घेतली. शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. सरकार स्थापनेपेक्षाही त्यांच्या जगण्याला आधार मिळण्याची आवश्यकता अधिक मोठी आहे. अशा परिस्थितीत राज्यपालांनी मधे पडून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

-----------------------------------------

VIDEO : शिवसेनेसोबत चर्चा झाली का? जयंत पाटलांचा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 7, 2019 08:00 PM IST

ताज्या बातम्या