'फडणवीसांसोबत आपलं भांडण सुरू', घटक पक्षाच्या मोठ्या नेत्याचा गौप्यस्फोट

'फडणवीसांसोबत आपलं भांडण सुरू', घटक पक्षाच्या मोठ्या नेत्याचा गौप्यस्फोट

बारामतीमध्ये एक कार्यक्रमात बोलत असताना महादेव जानकर यांनी एनडीएमधून बाहेर पडण्याचा चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

  • Share this:

बारामती, 09 डिसेंबर : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) राष्ट्रवादीमध्ये दाखल झाल्यानंतर भाजपला गळती लागणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. याच दरम्यान, भाजपचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar)यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची  भेट घेतल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आता खुद्द महादेव जानकर यांनीच या भेटीला दुजोरा देत धक्कादायक विधान केले आहे.

बारामतीमध्ये एक कार्यक्रमात बोलत असताना महादेव जानकर यांनी एनडीएमधून बाहेर पडण्याचा चर्चांना पूर्णविराम दिला आहे. यावेळी त्यांनी भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल धक्कादायक विधान केले आहे.

शेतकऱ्यांचं आंदोलन: पवार, राहुल गांधी राष्ट्रपतींना भेटले, मोदी सरकारवर हल्लाबोल

'माझं आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भांडण सुरू आहे. आमच्या दोघांमध्ये भांडण जरी सुरू असले तरी मी त्याचा फायदा हा दुसऱ्या कुणाला घेऊ देणार नाही' असं म्हणत जानकर यांनी एनडीएमधून तुर्तास बाहेर पडणार नाही' असं स्पष्ट केले आहे, याबद्दलचे वृत्त दैनिक लोकसत्ताने दिले आहे.

काही दिवसांपूर्वी महादेव जानकर यांनी पुण्यात शरद पवार आणि अजित पवार यांची भेट घेतली होती  विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीच्या 3 डिसेंबर रोजी ही भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्याजवळील व्हिएसआय इनस्टिट्युटमध्ये महादेव जानकर यांनी शरद पवार आणि अजितदादा यांची भेट घेतील. दोन्ही नेत्यामुळे बऱ्याच वेळ चर्चा झाली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते.

जगातल्या 100 बलशाली स्त्रियांची यादी जाहीर; निर्मला सीतारामन यांच्यासह 4 भारतीय

पण, या भेटीवर महादेव जानकर म्हणाले की, भाजपवर आपण नाराज असलो तरी कुठेही जाणार नाही. आपण सध्या एनडीएमध्येच आहोत आणि पुढेही एनडीएमध्येच राहणार आहे. आज भाजप विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे, पडत्या काळात त्यांची साथ सोडून पळून जाणार नाही' असंही त्यांनी स्पष्ट केले.

Published by: sachin Salve
First published: December 9, 2020, 6:09 PM IST

ताज्या बातम्या