लाचखोर अधिकाऱ्याला फिल्मीस्टाईलने निलंबित केल्याप्रकरणी महादेव जानकर चर्चेत

लाचखोर अधिकाऱ्याला फिल्मीस्टाईलने निलंबित केल्याप्रकरणी महादेव जानकर चर्चेत

आपण वारंवार विनंती करूनही एक अधिकारी आपले काम करत नव्हता, म्हणून त्याला पायातील 'बुटाची भाषा' समजवत त्याची थेट गड़चिरोलीला बदली केली , असं सांगुन मंत्री ,जानकर यांनी आपण किती दहशत करतो ,याची जाहीरपणे ग्वाही दिली आहे.

  • Share this:

27 ऑक्टोबर: दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर हे आपल्या शिवराळ भाषेतून केलेल्या वक्तव्यामुळे अनेक वेळा अडचणीत आले आहेत , मात्र अस असूनही त्यांनी आपली शिवराळ शैली कायम ठेवत , आपल्या खात्यातील अधिकाऱ्याना बुटाच्या भाषेत बोलत असल्याचं सांगत पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. जानकर यांनी सिनेमा स्टाईलने एका लाच खोर अधिकाऱ्याला निलंबित केल्याच्या बातमीची ,सध्या बरीच चर्चा आहे.

आपण वारंवार विनंती करूनही एक अधिकारी आपले काम करत नव्हता, म्हणून त्याला पायातील 'बुटाची भाषा' समजवत त्याची थेट गड़चिरोलीला बदली केली , असं सांगुन मंत्री ,जानकर यांनी आपण किती दहशत करतो ,याची जाहीरपणे ग्वाही दिली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये डेअरी व्यायसाईकांच्या एका कार्यशाळेला संबोधित करताना जानकरानी हे वक्तव्य करून उपस्थितांमध्ये असलेल्या आपल्या खात्यातील अधिकाऱ्यांना तंबी दिल्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 27, 2017 11:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading